एक्स्प्लोर

चुलत काकूकडून 3 वर्षाच्या मानवीचा खून, 5 दिवस मृतदेह स्वयंपाक घरातील गव्हाच्या कोठीत, निर्दयी काकू जेरबंद  

आर्णी तालुक्यातील कुऱ्हा गावची मानवी चोले ही तीन वर्षांची बालिका मागील सहा दिवसांपासून बेपत्ता होती. मानवीला ठार मारून तिचा मृतदेह गव्हाच्या लोखंडी कोठीमध्ये ठेवला होता.

यवतमाळ : चुलत काकूने स्वत:च्या तीन वर्षाच्या पुतणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. अंगणात किलबिलाट करीत असलेल्या मानविचा तिच्याचा काकूने निर्दयी खून केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
 
आर्णी तालुक्यातील कुऱ्हा गावची मानवी चोले ही तीन वर्षांची बालिका मागील सहा दिवसांपासून बेपत्ता होती. मानवीला ठार मारून तिचा मृतदेह गव्हाच्या लोखंडी कोठीमध्ये ठेवला होता. पाच दिवसानंतर मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने तो घरामागील पाण्याच्या टाकी जवळ ठेवला. मात्र पोलिसांनी खाख्या दाखविताच दिपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सहा दिवसांपासून रहस्यमय बेपत्ता असलेल्या मानवी चोले या मुलीच्या खुनाचा आता उलगडा झाला आहे. 

आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील तीन वर्षीय मानवी ही 20 डिसेंबर पासून घरासमोरूनच रहस्यमयरित्या अचानक बेपत्ता झाली होती. अशी तक्रार मृत मानवीचे वडील अविनाश चोले यांनी आर्णी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर मानवीला शोधण्यासाठी कुऱ्हा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथके व सायबर सेलचे एक अशी चार पथके गठीत करून गावाशेजारील जंगल, शेत शिवारासह अख्खा परिसर वन विभागाच्या मदतीने पोलिसांनी पिंजून काढला होता. मात्र कुठेही मानवीचा शोध लागत नव्हता. 
 
ज्या दिवशी मानवीचे अपहरण केले त्याचदिवशी तिला ठार केले व तिचा मृतदेह स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोट्या कोठीमध्ये लपवून ठेवला होता अशी माहिती पुढे आली आहे. गावामध्ये सतत पोलिसांचा वावर असल्याने आरोपी म्हणजेच चुलत काकू दिपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी मिळाली नाही. मानवीच्या मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला त्यावेळी तिने मृतदेह घराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ टाकून दिला. मानवीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच श्वानपथक बोलावून तपास सुरू करण्यात आला.
 
श्वानपथकने मानवीच्या शरीराभोवती पडलेले गव्हाचे दाणे आरोपीच्या घरातील स्वयंपाक घरापर्यंत पोचवले. त्यामुळे पुष्पा चोले हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

संशयीत आरोपीने खुनाची कबुली दिली असली तरी वेळोवेळी जबाब बदलत असल्याने मानविचा खून कसा आणि कुठल्या कारणातून केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

श्वानांने काढलेल्या मागातून मानविचा मृतदेह गव्हाच्या कोठीत दडविल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलीस श्वान पथकातील श्वानाने मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून तो कुठं दडवला होता इथंपर्यंत माग काढला. त्यामध्ये गोपाल चोले याच्या घरात जाऊन श्वान थांबले आणि तिथं असलेल्या लोखंडी कोठीकडे पाहून श्वान भुंकू लागले. पोलिसांनी ती कोठी उघडून पाहिली तेव्हा त्यातून उग्र वास येत होता. शिवाय कोठीपासून मृतदेहापर्यंत गव्हाचे दाणे ठीक ठिकाणी पडले होते. यावरून पोलिसांनी हा खून त्या घरातील व्यक्तीने केला असा संशय व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी मानविच्या काकुला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी काकुचे बिंग फुटले. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Embed widget