एक्स्प्लोर

Maharashtra COVID19 : राज्यात शुक्रवारी 2,068 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

Maharashtra COVID19 Updates for today : राज्यात शुक्रवारी दोन हजार 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार हजार 709 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 21 हजार 159 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी दोन हजार 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार हजार 709 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 21हजार 159 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात चार हजार 709 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 76 लाख 86 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के इतके झाले आहे. मागील 24 तासांत राज्यात 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे.  दरम्यान, राज्यात आजपर्यंत सात कोटी 70 लाख एक हजार 972 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,55,359 (10.20 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात दोन लाख ३७ हजार २५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर एक हजार 139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

3531 जणांची ओमायक्रॉनवर मात –
दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभराची चिंता वाढवली होती. महाराष्ट्रातही ओमायक्रॉन विषाणूने हाहाकार माजवला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत चार हजार 456 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, तीन हजार 531 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.  आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 931 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

मुंबईत शुक्रवारी 202 नवे रुग्ण -
 मुंबईत मागील दोन दिवसत वाढत असलेली नव्या कोरोनाबाधितांची संख्या  (Corona Updates) आज कमी झाली आहे. आज 202 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत 57 रुग्ण कमी आढळले आहेत. कारण गुरुवारी 259 नवे कोरोनाबाधित आढळले होते. मागील तीन दिवस मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाले नसताना आज मात्र एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2627 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 220 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता.  मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 202 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 365 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 780 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 259 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 319 बेड्सपैकी केवळ 838 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.03% टक्के इतका झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
Shilpa Shetty Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; 97 कोटींची संपत्ती जप्त
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; 97 कोटींची संपत्ती जप्त
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supriya Sule On Baramati Loksabha : लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंनी चौथ्यांदा भरला उमेदवारी अर्जRamtek Loksabha Election : रामटेकमध्ये उद्या 2 हजार 405 मतदान केंद्रावर मतदान पार पडणारChandrapur Loksabha Election : चंद्रपुरात 2118 मतदान केंद्र निवडणुकीसाठी सज्ज ABP MajhaSatara Mahayuti Sabha : सातारा मतदारसंघात उदयनराजेंच्या प्रचार रॅलीची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
Shilpa Shetty Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; 97 कोटींची संपत्ती जप्त
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; 97 कोटींची संपत्ती जप्त
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Premachi Goshta Serial Update : मुक्ताला पोलिसांनी केली अटक, कार्तिकचा डाव आता त्याच्यावर उलटणार?
मुक्ताला पोलिसांनी केली अटक, कार्तिकचा डाव आता त्याच्यावर उलटणार?
एलॉन मस्क भारतात येणार, कोट्यवधींची गुंतवणूक करणार? अवकाश संशोधनातही लावणार पैसा?
एलॉन मस्क भारतात येणार, कोट्यवधींची गुंतवणूक करणार? अवकाश संशोधनातही लावणार पैसा?
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
Congress : न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन पुन्हा लोकसभेला सक्सेस होणार?
न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन लोकसभेला सक्सेस होणार?
Embed widget