एक्स्प्लोर

रत्नागिरी जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची उभारणी होणार; कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यात रोज 20 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. परिणामी रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराजवळील कुवारबांव येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. मागील चार दिवसांचा विचार करता किमान रोज 20 नव्या रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढत आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णांचा इतिहास देखील जिल्ह्याबाहेरील प्रवासाचा आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा रूग्णालय हे कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण, सध्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता आता रत्नागिरी शहराजवळील कुवारबांव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवारबांव येथील सामाजिक न्याय भवन येथे हे सेंटर उभारले जाणार आहे. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रूग्णांना या नवीन कोविड केअर सेंटर दाखल केले जाणार आहे. या नव्या कोविड रूग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून चार स्टाफ नर्स देखील नियुक्त केल्या आहेत. शिवाय, अन्य स्टाफदेखील तात्काळ दिला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांवर उपचार करणे सोपे होणार आहे. कोरोनावर मात करत डॉ. दिपाली पुरी पुन्हा रुग्णसेवेत रुजू काय आहे जिल्ह्याची स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात आज रोजी 287 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 100 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा विचार करता एक महिन्यापूर्वी म्हणजेच 1 मे रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 होता. या सर्वांनी कोरोनावर मात केली होती. पण, त्यानंतर मात्र कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत गेला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 287 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आढळून आलेले बहुतांश रूग्ण हे जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत. आजघडीला जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या ही 1 लाखाच्या पार गेली आहे. तर 90 हजार पेक्षा जास्त रूग्ण हे होम क्वॉरंटाईन आहेत. तर 186 जण हे संस्थात्मक क्वॉरंटाईन आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला किती जणांचा प्रतिसाद? लॉकडाऊनच्या काळात भाड्यात कुणी सवलत देईना

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Nashik NMC: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget