(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATES | उद्या आणि परवा रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेवेळी शरद पवार अनुपस्थित, विधेयकावर शिवसेना-राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका सरकारकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान; कृषि विधेयकावरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकार वर हल्ला रुग्णाला 'ऑक्सिजन' किती द्यायचा हा अधिकार डॉक्टरांचाच! IPL 2020 DC vs KXIP | मयंक अगरवालची धडाकेबाज खेळी अपयशी, आयपीएलमध्ये काल रंगलेल्या सामन्यात पंजाबचा दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेवेळी शरद पवार अनुपस्थित, विधेयकावर शिवसेना-राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका
राज्यसभेत आज महत्त्वाच्या तीन कृषी विधेयकांना मंजुरी मिळाली. त्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण पेटलेलं आहे. सरकारने बहुमताच्या जोरावर ही तीन विधेयक लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही मंजूर केली. पण या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची भूमिका मात्र संदिग्ध राहिली.
राष्ट्रवादीच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांनी चर्चेत जे मत मांडलं त्यावरून राष्ट्रवादीचा थेट विरोध स्पष्ट होत नाही. असं क्रांतिकारी विधेयक आणण्याआधी शरद पवार, प्रकाश सिंग बादल यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती इतकीच त्यांची अपेक्षा होती. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभागृहाच्या कामकाजाबद्दल काटेकोर असतात. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या विधेयकाला ते अनुपस्थित होते.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान; कृषि विधेयकावरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकार वर हल्ला
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकावरुन मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. या बिलाला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे फर्मान असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. जे शेतकरी जमीनीतून सोनं पिकवतात त्यांना मोदी सरकारच्या अहंकारामुळे दुःख भोगावं लागत आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट मध्ये म्हटलय की "जे शेतकरी जमीनीतून सोनं पिकवतात, मोदी सरकारच्या अहकारामुळे त्यांना दुःख भोगावं लागत आहे. राज्यसभेत आज ज्याप्रकारे कृषि विधेयकाच्या रुपात सरकारने शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान काढलं, त्यामुळे लोकशाहीची मान खाली गेलीय"
रुग्णाला 'ऑक्सिजन' किती द्यायचा हा अधिकार डॉक्टरांचाच!
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून जो ऑक्सिजन दिला जातो तो किती द्यायचा असा आरोग्य विभागाने अजब फतवा काढल्याने वैद्यकीय क्षेत्रात कमालीची संतप्तता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस राज्यातील विविध भागात ऑक्सिजनची टंचाई भासत असल्याच्या तक्रारी होत असतानाच, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन वापराचे ऑडिट करून वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला अमुक इतका आणि अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णाला अमुक इतकाच ऑक्सिजन द्यावा असा अजब फतवा काढला. शिवाय ऑक्सिजन गळतीचे प्रकार होणार नाही याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी असे निर्देशित करण्यात आले. हा फतवा वैद्यकीय उपचारांना हरताळ फासणारा ठरणार असून अशा पद्धतीने रुग्णाचे उपचार करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी मत व्यक्त केले. दरम्यान, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्वतः याविषयी नापंसती व्यक्त करून अशा पद्धतीचा नियम योग्य नसून यासंदर्भात राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून हा नियम बदलावा अशी विनंती करणार आहोत असे स्पष्ट केले.
मयंक अगरवालची धडाकेबाज खेळी अपयशी, आयपीएलमध्ये काल रंगलेल्या सामन्यात पंजाबचा दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव
आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहज मात केली. विजयासाठी पंजाबने दिल्लीला अवघ्या 3 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाबकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मयंक अगरवालला सुपरओव्हरमध्ये न उतरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही संघांनी 157-157 धावा केल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्याआधी मयंक अगरवालने धडाकेबाज खेळी करत 59 चेंडूत 89 धावा केल्या. मात्र पंजाबला विजय मिळवून देऊ न शकल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. मार्क्स स्टॉयनिसने आणि कागिसो रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.