LIVE UPDATES | तोडगा न निघाल्याने सिलेंडर वाहतूक बंद राहणार
राहुल आणि प्रियंका गांधींकडून पीडित कुटुंबाची भेट, म्हणाले.. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रियंका गांधींशी गैरवर्तन; सर्वच स्तरातून टीकेची झोड IPL 2020 DC vs KKR: रोमांचक सामन्यात दिल्लीचा कोलकात्यावर विजय, श्रेयस अय्यरची शानदार खेळी राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये
Unlock 5 | पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी; हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरु होणार
राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
काय आहे अनलॉक 5 मध्ये?
- अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
- राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
- डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
- मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
- पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार
काय बंद राहणार?
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क
Unlock 5 Guidelines Released : केंद्राकडून शाळा, चित्रपटगृह, स्विमींग पूल सुरू करण्यास परवानगी, मात्र..
केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Unlock 5 Guidelines) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. सोबतचं खेळाडूंसाठी स्विमिंग पूल उघडण्यास देखील केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे, की 15 ऑक्टोबरनंतर शाळा आणि कोचिंग संस्था उघडण्याबाबत राज्य सरकारे निर्णय घेऊ शकता. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑक्टोबर कंपन्यांच्या स्तरावर आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम घेण्यास गृहमंत्रालयाने संमती दिली आहे. यासाठी मानक संचालन प्रक्रिया व्यावसायिक विभाग लवकरचं नियमावली जाहीर करणार आहे.
देशात महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 7 टक्के वाढ
सरकारच्या एका ताज्या आकडेवारीनुसार 2019 साली भारतात दर दिवशी सरासरी 79 खूनाची प्रकरणे घडतात तर अपहरणासंबंधीत घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी 66 टक्के गुन्हे ही बालकांशी संबंधीत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2019 साली खूनाची एकूण 28,918 प्रकरणे नोंदली गेली. 2018 (29,017) सालच्या तुलनेत हा दर 0.3 टक्क्यांनी घसरला आहे. सर्वाधिक म्हणजे 9,516 खूनाची प्रकरणे ही 'वाद' या कारणामुळे घडली तर 3,833 प्रकरणात 'वैयक्तीक शत्रुत्व' हे कारण होते. 2,573 खूनाची प्रकरणे ही कशाच्यातरी लाभाच्या लालसेतून घडली आहेत. या नव्या आकडेवारीतून देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून आले आहे. 2019 साली महिलांसंबंधी 4,05, 861 गुन्हे नोंदवण्यात आली होती जी 2018 च्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त असल्याचं दिसून आलंय. तर दरदिवशी बलात्काराच्या सरासरी 87 गुन्ह्यांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती या आकडेवारीतून समोर आली आहे. 2019 साली एकूण 32,033 गुन्हे बलात्कारासंबंधी नोंद झाली आहेत. यात राजस्थान प्रथम तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.