एक्स्प्लोर
दहीहंडीपर्यंत कोर्टाचे नियम न बदलल्यास सरकार विशेष अध्यादेश काढणार!
मुंबई : दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष कौन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करणार आहे. दहीहंडीपर्यंत नियमात बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव, दहीहंडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पारंपारिक सण हे साजरे होतीलच. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान आशिष शेलार यांनी या निर्णयानंतर शिवसेनेलाही टोला लगावला. मला सणांचं राजकारण करायचं नाही, राजकारण करणाऱ्यांना शुभेच्छा, असं म्हणत शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement