LIVE UPDATES | दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पंजाब आणि हरियाणा मधील खेळाडूंचा पाठिंबा
सीरम इन्स्टिट्युटचे अदार पूनावाला 'एशियन ऑफ द ईयर', कोरोना महामारीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पालघरमधील तारापूर येथे लोकसहभागातून साकारला 39 एकरांचा 'श्रीकृष्ण तलाव' IND Vs AUS 2nd T20 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी20 सामना; टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सीरम इन्स्टिट्युटचे अदार पूनावाला 'एशियन ऑफ द ईयर', कोरोना महामारीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांची 'एशियन ऑफ दी इयर' म्हणून निवड करण्यात आली आहे. द स्ट्रेट्स टाईम्स ऑफ सिंगापूरने अदार पूनावालासह सहा जणांना एशियन ऑफ द इयर सन्मानासाठी निवडले आहे. यावर्षी कोविड 19 साथीच्या विरूद्ध लढा देण्यास योगदान देणाऱ्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, कोविड 19 लस 'कोविशिल्ट' विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडन कंपनी अॅस्ट्रॅजेनेका यांच्याबरोबर काम करत आहे. त्यासाठी कोरोना लसीची चाचणी भारतात घेण्यात येत आहे.
पालघरमधील तारापूर येथे लोकसहभागातून साकारला 39 एकरांचा 'श्रीकृष्ण तलाव'
देशात अनेक भागाला मार्चनंतर दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून याला आता कोकणही अपवाद राहिलं नाही. शासनाकडून अनेक उपाययोजना सुरु केल्या जातात त्या बंदही पडतात. मात्र पालघरमधील तारापूर जवळील कुडण येथे लोकसहभागातून तब्बल 39 एकरवर दीड किलोमीटर लांबीचा तलाव तयार करण्यात आला आहे. या तलावामुळे या परिसरातील नागरिकांसह, प्राण्यांची,पक्ष्यांचीही तहान भागवण्यास मोठी मदत होत आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुशक्ती केंद्राच्या बाजूलाच असलेल कुडण गाव याच गावाच्या बाजूला खारटण जमीन. एरवी या जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत असल्याने खारटण असल्याने काहीही उपयोग होत नव्हता. तर आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे दुर्भिक्ष जाणवत होतं, मात्र हेच पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी या भागातील सामाजिक काम करणारी लोक धावून आली. यामध्ये लायन्स क्लब तारापूर आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून 39 एकरवर गोड्या पाण्याच्या तलावाची निर्मिती करण्याचा विचार झाला आणि 2017 साली सुरु झालेल काम सध्या पूर्णत्वास आलं आहे.
IND Vs AUS 2nd T20 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी20 सामना; टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी
एकदिवसीय सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 असा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. रविवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमध्ये दुसरा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासमोर दुसरा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या टी20 सामन्यात वापसी करणं अवघड असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात दुखापतींचं सत्र सुरुच असून अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.
डेव्हिड वॉर्नर आधीपासून सीरिजमधून बाहेर आहे. कर्णधार एरॉन फिंचलाही पहिल्या टी20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात फिंच खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. जर दुसऱ्या टी20 सामन्यांत फिंच खेळला नाही तर हा यजमान संघासाठी मोठा धक्का असणार आहे. जर फिंच आजच्या सामन्यात गैरहजर राहिला तर संघासाठी धावांचा डोंगर रचण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथवर असणार आहे.