एक्स्प्लोर

Coronavirus Updates: घाबरू नका, पण काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत टास्क फोर्सने दिली महत्त्वाची माहिती

Coronavirus Updates: चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून काळजी घेतली पाहिजे असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

Coronavirus Updates: चीनमध्ये वेगाने फैलावत असलेल्या कोरोनाच्या बीएफ.7  वेरिएंटने (Coronavirus BF.7 variant) जगाची चिंता वाढवली आहे. मात्र, कोरोनाच्या या व्हेरियंटमुळे फारशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे  राज्याचे आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आणि कोरोना टास्क फोर्सचे (Coronavirus Task Force) सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले. भारतात बीएफ.7 नव्या वेरियंटचेचे रुग्ण गुजरातमध्ये जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातच सापडले होते. जर हा वेरिएंट अधिक संसर्गजन्य असता, तर आजवर गुजरात (Gujarat) आणि संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण दिसून आले असते. मात्र तसे झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले. 

डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. मागील आठवड्यात राज्यातील कोरोनाबाधितांची प्रकरणे 30 टक्क्यानी कमी झाली आहेत. गेल्या आठवड्यात फक्त 16 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असल्याची माहिती त्यांनी दिली. चीन, जपान, अमेरिका आणि इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. चीनमध्ये बीएफ.7 मुळे संक्रमण वाढत आहे. मात्र हा काही नवीन व्हेरियंट नाही. हा ओमायक्रॉनचा प्रकार असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. 

बीएफ.7 गुजरात मध्ये जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात आढळला होता. मात्र, त्याचा फैलाव झाला नाही. त्यामुळे चीनमध्ये धुमाकूळ घालणारा बीएफ.7 हा व्हेरियंट भारतातही धुमाकूळ घालेल  याची शक्यता कमी आहे. या व्हेरिएंटमुळे नवीन लाट निर्माण होईल अशी शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले. 

जिनोम सिक्वेन्सिंग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा संक्रमण कमी असतो तेव्हा शंभर टक्के लोकांचा जीनोम सिकवेंसिंग करणं आवश्यक आहे आणि आपण तसंच करत असल्याचे नव्या व्हेरियंटबद्दल लगेच कळावे म्हणून हे करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मेसेज अर्धवट माहिती असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. कोरोना बीएफ.7  व्हेरिएंटची लागण झालेली दोन प्रकरणे जुलै आणि ऑक्टोबरमध्ये सापडूनही संसर्ग वाढला नाही, ही बाब लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना बीएफ.7 व्हेरियंटचा फैलाव चीनमध्ये वाढत असला तरी भारताच्या वातावरणात याची वाढ होत नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

चीनमध्ये बीएफ.7 व्हेरिएंटचा फैलाव वेगाने होण्यामागे अनेक कारणे आहेत. चीनमधील बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात. चीनमधील हवामान-वातावरण भारताच्या तुलनेत वेगळे आहे. त्यांची लसदेखील वेगळी आहे, अशी वेगवेगळी कारणे आहेत, असे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले. एक्सबीबीबी किंवा इतर व्हेरियंट युरोप आणि अमेरिकेत फैलाव झाला. मात्र ते आपल्याकडे हा व्हेरिएंट आढळूनही त्याच्या बाधितांची संख्या वाढली नाही. ही सगळी व्हेरियंट ओमायक्रोनची वंशावळ असल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. 

कोरोनाच्या या व्हेरियंटने घाबरून न जाता काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करायला हवा, असे त्यांनी म्हटले. कोरोना लशीचा तिसरा डोस ज्यांनी घेतला नाही, त्या नागरिकांनी तिसरा डोस घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget