Coronavirus | रत्नागिरीत कोरोनाचा आणखी एक रूग्ण; कोरोनाबाधित रूग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे काय आहेत रिपोर्ट?
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्हात आढळून आलेल्या पहिल्या रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला डिस्चार्ज दिल्यामुळे जिल्ह्यात काही काळ आनंदाचं वातावरण होते. पण, हा आनंद केवळ काही क्षणांपुरता मर्यादित राहिला. कारण, साखरतर या गावातील आणखी एका महिलेचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित महिला ही साखरतर येथील कोरोनाबाधित रूग्णाची नातेवाईक आहे. सध्या या महिलेचे 14 नातेवाईक हे जिल्हा रूग्णालय येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेले आहेत. गुरूवारी ( काल ) दिवसभरात 17 जणांचे रिपोर्ट हे तपासणीकरता पाठवण्यात आले होते. त्यापैकी 15 रिपोर्ट हे मिळाले असून पैकी 1 जण कोरोनाबाधित असल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. तर, अद्याप 2 रिपोर्ट हे प्रतिक्षेत आहेत. साखरतर येथील महिला कोरोनाबाधित असल्याचं समोर आल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 5 झाली आहे. सध्या एका रूग्णाला सोडण्यात आले आहे तर, खेड येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ति ही दुबई येथून आलेली होती. या प्रकरणाची माहिती लवपल्याप्रकरणी खेड येथील खासगी डॉक्टरवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
राजीवडा येथील 1, साखरतर येथील 2 रूग्ण
रत्नागिरीमध्ये पहिला आढळून आलेला कोरोनाचा पहिला रूग्ण हा गुहागरच्या शृंगारतळी येथील होता. त्याला आता जिल्हा रूग्णालयातून सोडण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरीतील राजीवडा या भागातील एक रूग्ण आणि साखरतर येथील दोन रूग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी घेत राजीवडा आणि साखरतर परिसर सील करण्यात आला आहे. शिवाय, या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी देखील केली जात आहे.
पाहा व्हिडीओ : रत्नागिरी पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी
रत्नागिरीचे मरकज कनेक्शन
दिल्लीतील मरकज येथे रत्नागिरीतील 7 जण गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापैकी दोघांना अनुक्रमे मुंबई आणि आग्रा येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेले आहे. तर, राजीवडा या भागातील कोरोनाबाधित रूग्ण देखील मरकज येथे गेल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मरकजला गेलेल्यांना जिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. मुंबई, पुणे किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तिंनी समोर यावे. लपून न राहता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केले आहे.
संबंधित बातम्या :
Lockdown | राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांचा रुट मार्च, नागरिकांकडून फुलांचा वर्षाव
औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार