एक्स्प्लोर

देशात आधीच इतकी रोगराई, एकाची भर पडली तर काय फरक पडतो : राज ठाकरे

जीवघेण्या कोरोनासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबादेत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली.

औरंगाबाद : देशात आधीच इतकी रोगराई, त्यात आणखी एकाची भर पडली तर काय फरक पडतो, असं वक्तव्य जीवघेण्या कोरोनासंदर्भात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते औरंगाबादेत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली गेली. महाराष्ट्रात वर्षाचे 365 दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं मत यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये मनसेचा तिथीनुसार शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते शिवपूजन पार पडलं. यावेळी फेटा बांधून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आला. सर्व सण तिथीनुसार साजरे होतात, त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याचे राज यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशात आधीच इतकी रोगराई, त्यात आणखी एकाची भर पडली तर काय फरक पडतो. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहेच, पण महाराष्ट्रात कोरोनाच्या फारशा काही केसेस नाहीत. कुणीही दगावलेलं नाही. असं असताना प्रशासनाकडून अनेक गोष्टींवर बंदी घातली जातेय. परवानगी नाकारली जातेय. कशासाठी लोकांना विनाकारण घाबरवत आहात? असा सवालही राज ठाकरे यांनी काल, बुधवारी केला होता. Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 9; राज्यात एकूण 12 कोरोनाग्रस्त राज ठाकरे म्हणाले की, काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे याबद्दल दुमत नाही. पण कोरोनाच्या नावानं ज्या प्रकारे आव आणला जातोय, त्याला काही अर्थ नाही. आपल्याकडं इतर अनेक प्रकारची रोगराई आहे. माझ्या माहितीनुसार देशात दिवसाला 400 लोकं टीबीनं मरतात. वर्षाकाठी हा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे. इतकी रोगराई इथं आधीच असताना कोरोनावरून एवढा गोंधळ का माजवला जातोय? नाशिकला 144 कलम लावलंय. कशासाठी लोकांना घाबरवताय? पोलिसांना याची नेमकी किती माहिती आहे, असा सवाल राज यांनी केला. #CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचं नाव सांगून शिवजयंतीला परवानगी नाकारत असाल तर संभाजीनगरच्या निवडणुका अवघ्या 25-30 दिवसांवर आल्यात. त्या पुढं ढकलणार आहात का? कारण, हा एक-दोन दिवसांचा आजार नाही. अजून त्यावर औषध सापडलं नाही. मग निवडणुकांवरही निर्णय घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget