एक्स्प्लोर
उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत एकाच दिवशी संचारबंदीसाठी तैनात दहा पोलिसांना मारहाण
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे.
बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी सुरू असताना बारामतीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यात दोन ठिकाणी संचारबंदीसाठी तैनात पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार समोर आले आहेत. काल दुपारी बारामती शहरातील जळोची भागात पोलिसांवर काही नागरिकांनी मारहाण केली होती. यात काही कॉरंटाईन नागरिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे तर काटेवाडीत देखील पोलिसांना मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काटेवाडी हे अजित पवार यांचं गाव म्हणून ओळखले जाते. शहरात दिवसभरात एकूण दहा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे बारामतीत पोलिसांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.
याआधीही वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं होतं तर बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. तर मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे.
‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारीच दिला होता. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते. तसंच शरद पवार यांनी देखील सध्याच्या परिस्थितीत नागरिकांकडून शिस्तीची गरज आहे. मात्र पोलिसांनी देखील सामंजस्यानं वागावं, असं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement