एक्स्प्लोर

हॉटेलमधील पदार्थ घरपोच तर अंडी, कोंबडी, मटण, मासे विक्रीला परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. हॉटेलमधील पदार्थ घरपोच तर अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी त्यांनी दिली आहे. तर सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्रीही मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. --

मुंबई : जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली. कोरोनामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट, पीक कर्जाची परतफेड शक्य नाही : शरद पवार राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Rakul Preet Singh's Brother Aman Preet Singh Arrest :  अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaMajha Gav Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Cracked SBI gas cutter : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गँस कटरने फोडलेAjit Pawar Vidhansabha Plan : अजित दादांचा धडाका, 288 मतदारसंघाचा आढावा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Rakul Preet Singh's Brother Aman Preet Singh Arrest :  अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
Horoscope Today 16 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
Embed widget