coronavirus LIVE UPDATES | पुण्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, एकूण संख्या 33
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण
रविवारी दिवसभरात राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. आज राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबर कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यातील 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 217 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5064 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी
ठाणे मंडळ एकूण
मुंबई महानगरपालिका - 1298 ( मृत्यू - 92)
ठाणे - 6
ठाणे मनपा - 44 (मृत्यू - 3)
नवी मुंबई मनपा - 45 (मृत्यू - 3)
कल्याण डोंबवली मनपा - 46 (मृत्यू - 2)
उल्हासनगर मनपा - 1
भिवंडी निजामपूर मनपा - 1
मीरा भाईंदर मनपा 42 (मृत्यू - 1)
पालघर - 4 (मृत्यू - 1)
वसई विरार मनपा - 21 (मृत्यू - 3)
रायगड - 4
पनवेल मनपा - 8 (मृत्यू - 1)
नाशिक मंडळ
नाशिक - 2
नाशिक मनपा - 1
मालेगाव मनपा - 15 (मृत्यू - 2)
अहमदनगर 10
अहमदनगर मनपा -16
धुळे - 1 (मृत्यू - 1)
जळगाव - 1
जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1)
पुणे मंडळ
पुणे - 7
पुणे मनपा -233 (मृत्यू - 30)
पिंपरी चिंचवड मनप - 23
सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1)
सातारा - 6 (मृत्यू - 2)
कोल्हापूर मंडळ
कोल्हापूर - 1
कोल्हापूर मनपा - 5
सांगली - 26
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1)
औरंगाबाद मंडळ
औरंगाबाद - 3
औरंगाबाद मनपा - 16 (मृत्यू - 1)
जालना - 1
हिंगोली - 1
लातूर मंडळ
लातूर मनपा- 8
उस्मानाबाद - 4
बीड - 1
अकोला मंडळ
अकोला मनपा - 12
अमरावती मनपा -5 (मृत्यू - 1)
यवतमाळ - 4
बुलढाणा - 13 (मृत्यू - 1)
वाशिम - 1
नागपूर मंडळ
नागपूर - 1
नागपूर मनपा - 27 (मृत्यू - 1)
गोंदिया -1
इतर राज्ये / परदेश - 9 (मृत्यू - 1)
निजामुद्दीन मरकजहून परतलेले 37 जण कोरोनाबाधित
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 37 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6, मुंबईत 3 तर प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर एक जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4846 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17.46 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील 26 जण कोरोनाबाधित आढळले होते. यातील 24 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे. इस्लामपुरातील या भागात 31 सर्वेक्षण पथकांनी मागील 2 आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.