Coronavirus LIVE UPDATE | जगभरात कोरोनाचे मृत्यूतांडव : इटलीत आज 431 नागरिकांचा मृत्यू
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील साडेसातहजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
LIVE
Background
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1761 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 12 जण मुंबईत, 2 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण सातारा, धुळे, मालेगाव येथील आहे. राज्यात आतापर्यंत127 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 36 हजार 761 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38 हजार 800 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4964 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 208 कोरोना बाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरूष तर ६ महिला आहेत. त्यातील 6 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर तिघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 17 रुग्णांपैकी 16 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1761
मृत्यू - 127
मुंबई महानगरपालिका- 1146 (मृत्यू 76)
ठाणे- 6
ठाणे महानगरपालिका- 29 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 36 (मृत्यू 2)
कल्याण डोंबिवली- 35 (2)
उल्हासनगर- 1
मिरा-भाईंदर- 36 (मृत्यू 1)
पालघर- 4 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 14 (मृत्यू 3)
पनवेल- 7 (मृत्यू 1)
नाशिक - 2
नाशिक मनपा- 1
मालेगाव मनपा - 11 (मृत्यू 2)
अहमदनगर- 10
अहमदनगर मनपा - 16
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)
पुणे- 7
पुणे मनपा- 228 (मृत्यू 27)
पिंपरी-चिंचवड मनपा- 22
सातारा- 6 (मृत्यू 2)
कोल्हापूर- 1
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 5 (मृत्यू 1)
औरंगाबाद- 3
औरंगाबाद मनपा- 16 (मृत्यू 1)
जालना- 1
हिंगोली- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-4
बीड - 1
अकोला मनपा - 12
अमरावती मनपा- 4 (मृत्यू 1)
यवतमाळ- 4
बुलढाणा - 13 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर मनपा - 25 (मृत्यू 1)
गोंदिया - 1