एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 Test Labs | राज्यातील शासनमान्य कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची यादी
राज्यात कोविड 19 ची तपासणी कुठे कुठे होते याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. राज्यात जिल्हानिहाय या प्रयोगशाळा असणार आहेत, जिथे कोरोनाची तपासणी होणार आहे.
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 120 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 868 वर पोहोचली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तात्काळ तपासणी करुन घ्या अस शासनाकडून सांगितलं जातंय. मात्र ही तपासणी कुठे करायची हेच अनेकांनी माहित नाही. राज्यात कोविड 19 ची तपासणी कुठे कुठे होते याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे.
जिल्हानिहाय आणि संस्थानिहाय कोव्हिड-19 तपासणी केंद्रांची यादी
- मुंबई महानगर महापालिका - कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई
- ठाणे जिल्हा, रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
- पालघर जिल्हा, उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका - हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
- सातारा जिल्हा - बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
- पुणे जिल्हा - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
- अहमदनगर जिल्हा आणि नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
- कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, सांगली
- सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याकरिता - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
- धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) - श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
- औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्याकरिता - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
- अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याकरिता - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
- नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
Advertisement