एक्स्प्लोर

Coronavirus In Maharashtra : 'कोविड’ उपाययोजनांसाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

Maharashtra Coronavirus Task Force :  राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असताना आता दुसरीकडे सरकारने पुन्हा एकदा टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

Maharashtra Coronavirus Task Force :  कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने टास्क फोर्सची (Covid Task Force) स्थापना केली आहे. कोविड- 19 च्या (Covid-19) पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या निर्णयान्वये टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर आता. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

राज्य सरकारच्या टास्क फोर्समध्ये कोण?

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश  कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

टास्क फोर्स करणार काय?

गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोविड-19 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-19 क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे. 

राज्यात मंगळवारी 37 नव्या कोरोना रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतेय. मंगळवारी (26 डिसेंबर) राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यानंतर ठाणे आणि पुण्यातही दररोज रुग्ण वाढत आहेत. नाताळ आणि नववर्षामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. राज्यात 26 डिसेंबरपर्यंत जेएन 1 व्हेरियंटचे 10 रुग्ण आहेत. 

मुंबईत सर्वाधिक रुग्ण 

मुंबईतील कोरोना रुग्णांची संध्या वाढली आहे. मंगळवार, 26 डिसेंबर रोजी मुंबईत नव्याने 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 26 डिसेंबरपर्यंत घडीला 88 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, JN -1 या नव्या सबव्हेरियंटचा एकही रुग्ण मुंबईत नाही.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray :  मी माहीममधून लढणारच, राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही,Ajit Pawar Vidhansabha : बारामतीचे फिक्स आमदार, ओन्ली अजितदादा पवार, दिव्यांगाने पायाने चिठ्ठी लिहिलीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 02 November 2024Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Embed widget