(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Maharashtra : राजेश टोपे यांचा इशारा, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास....
Coronavirus Maharashtra : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार आहे.
Rajesh Tope on Coronavirus Maharashtra : राज्याची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल होत असून, यापुढे नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असून पोलीस आणि प्रशासनाला गर्दी टाळण्यासाठी प्रसंगी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी राज्यात 36,265 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्बंधही वाढण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, अनावश्यक गोष्टी मुळे संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यास पुढील काही कालावधीमध्ये निर्बंध वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो. याबाबत मुख्यमंत्री घोषणा करू शकतात.
राजेश टोपे यांनी सांगितले की, रुग्णालयात भरती होण्याचे तसेच ऑक्सिजन वापराचे प्रमाण वाढले नाही. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र या महासाथीपासून लस वाचवू शकेल. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
पुणे, मुंबई तसेच ठाणेमधील पॉझिटिव्हीटी रेट तसेच ओमायक्रोनचा वेग पाहता तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तर, इतर जिल्ह्यात मात्र अशी परिस्थिती नाही त्यामुळे त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा लगेचच निर्णय होणार नसल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Coronavirus : तिसऱ्या लाटेचा चिमुकल्यांना धोका! देशात चिमुकल्यांच्या कोरोना संसर्गात झपाट्याने वाढ
- Omicron : भारताला ओमायक्रॉनचा विळखा, 26 राज्यांमध्ये 2 हजार 630 ओमायक्रॉनबाधित
- भारतात ओमायक्रॉनमुळं दुसरा मृत्यू; ओदिशात 55 वर्षीय महिलेनं गमावला जीव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha