Coronavirus in Maharashtra Live Updates | राज्यात आज 2091 नवे कोरोनाबाधित, 97 जणांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात सोमवारी (25 मे) कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
LIVE

Background
Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात सोमवारी (25 मे) कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात सोमवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52,667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 30 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 479 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 15,786 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
