एक्स्प्लोर

श्रावणी सोमवारवरही कोरोनाचा परिणाम; मार्लेश्वरला दर्शनबंदी असल्याने महादेव भक्त नाराज

श्रावण मासात मार्लेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण, कोरोनामुळे मात्र या ठिकाणी येण्यास भाविकांना बंदी आहे. परिणामी आता इथला व्यवसाय बुडाला असून लाखो रुपयांच्या उलाढालींवरही परिणाम झाला आहे.

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक सण साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. अगदी गणेशोत्सवावरही कोरोनामुळे झालेला परिणाम सर्वांना माहितच आहे. पण, आता चार दिवसांवर आलेल्या श्रावणी सोमवारवर देखील कोरोनाचा परिणाम दिसून येणार आहे. श्रावणातील सोमवार म्हटलं की, भाविक मोठ्या प्रमाणात शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. पण, यंदा मात्र भाविकांना त्याठिकाणी जाता येणार नाही आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान. महादेवाचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वरमध्ये श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. पण, यंदा मात्र भाविकांना या ठिकाणी येता येणार नाही. कोरोनामुळे देशातील देवस्थाने बंद आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे देवस्थान भक्तांसाठी बंद आहे. या ठिकाणी दररोज शंभू महादेवाची पूजा आणि आरती मात्र नित्य होत आहे. पण, भाविकांची होणारी गर्दी मात्र थांबली आहे. जिल्हाधिकारी आणि न्यास याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुलं करता येणार नसल्याची माहिती तिथल्या पुजाऱ्यांनी दिली आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या दुकानदारांवर देखील कोरोनाचा परिणाम होताना दिसत आहे.

श्रावणी सोमवारवरही कोरोनाचा परिणाम; मार्लेश्वरला दर्शनबंदी असल्याने महादेव भक्त नाराज

काय होतोय परिणाम? रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमधील मारळ या गावी मार्लेश्वर हे देवस्थान येते. दररोज या ठिकाणी हजारो भाविक येतात. पण, श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे देवस्थान भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास शंभर दुकाने आहेत. त्या ठिकाणी प्रसाद, ओटी, नारळ, हार-फुले शिवाय जेवणाची सोय केली जाते. पण, यंदा मात्र हे सारे ठप्प आहे. वर्षाच्या इतर दिवसांची तुलना करता श्रावण महिन्यातील या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यावरच इथला रोजगार आणि उलाढाल अवलंबून असते. पण, यंदा मात्र सारे ठप्प आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सध्या दुकाने बंद आहेत. आतापर्यंत आम्ही कसेबसे दिवस काढले. शेती केली. या दुकानांवरच आमचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. पण, आता मात्र यापुढे अवघड होणार आहे. किती काळ आणखी जाईल माहित नाही. दुकानं बंद असल्यामुळे आम्हाला आता मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेकडो जण काम करत आपलं पोट भरतात. पण, आता काय करायचे? हा प्रश्व आम्हाला सतावत असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणचे दुकानदार रुपेश सावंत यांनी 'एबीपी माझा'कडे व्यक्त केली.

निसर्ग रम्य वातावरण

मार्लेश्वरचे नैसर्गिक वातावरणही तितकंच नयनरम्य आहे. पावसाळ्यात ते आणखी खुलून जाते. उंचच उंच डोंगरांवरुन कोसळणारे फेसाळलेले धबधबे, हिरवाईने नटलेला परिसर आणि मोराचा केका हे सारं मन प्रसन्न करुन सोडते. भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाप या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना पाहायला आणि अनुभवता येतो. पण, यंदा कोरोनामुळे मात्र येथे येणारी भाविक निराश असून शंभूदेवाच्या भेटीसाठी आतुर असल्याची प्रतिक्रिया इथल्या पुजाऱ्यांनी 'एबीपी माझा'कडे दिली आहे. पण सरकारी आणि प्रशासकीय निर्णय होईपर्यंत भक्तांना वाट मात्र पाहावी लागणार आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget