एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus Guidelines Restrictions LIVE Updates: जाणून घ्या कोरोनासंदर्भातील विविध जिल्ह्यांतील नियमावली, निर्बंध तसंच यासंदर्भातील स्थानिक बातम्या

Maharashtra Coronavirus Guidlines Restrictions LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, राज्य आणि देशभरासह राज्यातील कोरोना नियमावली, निर्बंधासंबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Coronavirus Guidelines Restrictions LIVE Updates: जाणून घ्या कोरोनासंदर्भातील विविध जिल्ह्यांतील नियमावली, निर्बंध तसंच यासंदर्भातील स्थानिक बातम्या

Background

Mumbai Local : लोकल प्रवासावर निर्बंध? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...
दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळं मुंबईची चिंता वाढली आहे. अशातच पुढील आठवडा मुंबईसाठी महत्त्वाचा असून मुंबईत तिसरी लाट (Mumbai Lockdown) धडकल्याचं बोललं जात आहे. अशातच मुंबईत लॉकडाऊन लागणार का? तसेच निर्बंध कठोर होणार का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलवर निर्बंध लावले जाणार का? अशी भितीही मुंबईकरांना वाटत आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. 

आज मुंबईतील व्हाय. बी. सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. त्याबैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला नसल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "शरद पवारांचा दररोज सर्वांशी संपर्क असतो. त्यांना सध्या वाढत असलेली जी परिस्थिती आहे, काल (बुधवारी) 25 हजारांच्या आसपास राज्यात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. उद्या कदाचित 35 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होईल, असं आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. त्यासंदर्भात त्यांना अधिक माहिती घ्यायची होती. त्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सध्याची परिस्थिती, त्यावरचा उपाय आणि काय निर्बंध लादले जाऊ शकतात याबाबत चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी सेवांमुळे जर संख्या वाढत असेल, तर त्याबाबतीतले निर्बंध अधिक वाढवण्याची गरज असेल, तर ते करावे, अशा संदर्भातील चर्चा झाली."

coronavirus : जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाताय? 'हे' नियम पाळले तरच मिळणार मंदिरात प्रवेश
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ओसरत चाललेले कोरोनाचे (Corona) संकट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा गडद होऊ लागले आहे. आता तर कोरोनाने देशभरात नुसता धुमाकूळच घातला आहेत. त्यामुळे ओग्ययंत्रणेसह प्रशासनानेही कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेजुरी (Jejuri) येथील खंडेरायाच्या मंदिरातही आता दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

21:48 PM (IST)  •  06 Jan 2022

तरीही मुंबई लॉकडाऊन नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

आज मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजार पेक्षा अधिक आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामूळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात बेड्स शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील वाढली नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलेय. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखिल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलेय. बीएसव्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या उदघाटन प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केलेय.

20:36 PM (IST)  •  06 Jan 2022

परभणीत 24 तासांत 21 नवीन रुग्णांची भर 

काही महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवशी नवीन 21 रुग्ण आढळले आहेत. 1737 तपासण्या नंतर हे 21 रुग्ण आढळले असून यामुळे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 94 झाली आहे.

17:16 PM (IST)  •  06 Jan 2022

हिंगोलीत खासगी रुग्णालयातील 3000 बेड आरक्षित, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश 

हिंगोलीत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून खासगी रुग्णालयातील 3000 बेड आरक्षित करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व विभाग, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. 

16:10 PM (IST)  •  06 Jan 2022

निर्बंध वाढवा पण पंढरपूर विठ्ठल मंदिर बंद करु नका, भाविकांची मागणी

नांदेडमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारीच कोकणातील शाळा बंद करण्यात आल्या. पंढरपूर विठ्ठल मंदिर बंद करु नका अशी भाविकांची मागणी आहे. निर्बंध वाढवा पण मंदिर बंद नको अशी मागणी भाविकांनी केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget