Coronavirus | राज्यात आज 811 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 7628
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7628 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 811 ने वाढला असून मुंबईची रुग्ण संख्या पाच हजारावर गेली आहे. तर दिवसभरात 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 811 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 7628 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 13 जण मुंबईचे तर पुण्यातील चार आणि मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, धुळे, सोलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 323 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 119 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 7628 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 293 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8124 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 957 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील 11 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे. मृत्यू झालेल्या 22 रुग्णांपैकी 13 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे आजार आहेत.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 6817
मृत्यू - 301
मुंबई महानगरपालिका- 5049 (मृत्यू 191)
ठाणे- 717(मृत्यू 15)
पालघर- 139 ( मृत्यू 4)
रायगड- 56 (मृत्यू 1)
नाशिक - 131 (मृत्यू 12)
अहमदनगर- 35 (मृत्यू 2)
धुळे - 25 (मृत्यू 3)
जळगाव- 13 (मृत्यू 2)
नंदुरबार - 11 (मृत्यू 1)
पुणे- 1030 (मृत्यू 73)
सोलापूर - 46 (मृत्यू 4)
सातारा- 29 (मृत्यू 2)
कोल्हापूर- 10
सांगली- 26 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 50 (मृत्यू 5)
जालना- 2
हिंगोली- 8
परभणी - 1
लातूर -9
उस्मानाबाद-3
बीड - 1
नांदेड - 1
अकोला - 23 (मृत्यू 1)
अमरावती - 19 (मृत्यू 1)
यवतमाळ- 28
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर मनपा - 107 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 555 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 8194 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 31.43 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
Sanitizer Tunnel | सॅनिटायझर टनेलविषयी पुण्यातील 4 शास्त्रज्ञांचं संशोधन, दहा दिवस स्वत:वरच केला प्रयोग