एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 1408 रुग्ण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या 41642 वर

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2345 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 41,642 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1408 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41,642 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, मालेगाव 9, पुण्यात 7, औरंगाबाद 3, नवी मुंबईमध्ये 2, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1408 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 68 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 41,642 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 37 हजार 304 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 865 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 11,726 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 36 पुरुष तर 28 महिला आहेत. त्यातील 31 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 64 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 41,642

मृत्यू - 1454

मुंबई महानगरपालिका- 25,500 (मृत्यू 882)

ठाणे- 338 (मृत्यू 4 )

ठाणे महानगरपालिका- 2048 (मृत्यू 33)

नवी मुंबई मनपा- 1668 (मृत्यू 29)

कल्याण डोंबिवली- 641 (मृत्यू 6)

उल्हासनगर मनपा - 131 (मृत्यू 2)

भिवंडी, निजामपूर - 80 (मृत्यू 3)

मिरा-भाईंदर- 362 (मृत्यू 4)

पालघर- 102 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 425 (मृत्यू 11)

रायगड- 285 (मृत्यू 5)

पनवेल- 271 (मृत्यू 11)

नाशिक - 113

नाशिक मनपा- 84 (मृत्यू 2)

मालेगाव मनपा - 710 (मृत्यू 43)

अहमदनगर- 47 (मृत्यू 5)

अहमदनगर मनपा - 19

धुळे - 15 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 80 (मृत्यू 6)

जळगाव- 252 (मृत्यू 29)

जळगाव मनपा- 79 (मृत्यू 4)

नंदुरबार - 26 (मृत्यू 2)

पुणे- 255 (मृत्यू 5)

पुणे मनपा- 4207 (मृत्यू 222)

पिंपरी-चिंचवड मनपा- 203 (मृत्यू 7)

सातारा- 184 (मृत्यू 2)

सोलापूर- 10 (मृत्यू 1)

सोलापूर मनपा- 512 (मृत्यू 27)

कोल्हापूर- 141 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 20

सांगली- 54

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 9 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 10

रत्नागिरी- 123 (मृत्यू 3)

औरंगाबाद - 20

औरंगाबाद मनपा - 1106 (मृत्यू 39)

जालना- 43

हिंगोली- 110

परभणी- 15 (मृत्यू 1)

परभणी मनपा-3

लातूर -51 (मृत्यू 2)

लातूर मनपा- 3

उस्मानाबाद-19

बीड - 13

नांदेड - 11

नांदेड मनपा - 81(मृत्यू 4)

अकोला - 29 (मृत्यू 2)

अकोला मनपा- 315 (मृत्यू 15)

अमरावती- 9 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 131 (मृत्यू 12)

यवतमाळ- 111

बुलढाणा - 38 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 3

नागपूर मनपा - 434 (मृत्यू 6)

वर्धा - 3 (मृत्यू 1)

भंडारा - 9

चंद्रपूर -8

चंद्रपूर मनपा - 7

गोंदिया - 3

गडचिरोली- 7

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1949 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 15,894 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 64.89 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Corona 100 Updates | कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स एका क्लिकवर

संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.