एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात आज 187 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 1761 वर

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1761 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 187 ने वाढला आहे, तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1761 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 12 जण मुंबईत, 2 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण सातारा, धुळे, मालेगाव येथील आहे. राज्यात आतापर्यंत127 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 36 हजार 761 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38 हजार 800 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4964 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 208 कोरोना बाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरूष तर ६ महिला आहेत. त्यातील 6 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर तिघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 17 रुग्णांपैकी 16 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1761

मृत्यू - 127

मुंबई महानगरपालिका- 1146 (मृत्यू 76) ठाणे- 6 ठाणे महानगरपालिका- 29 (मृत्यू 3) नवी मुंबई मनपा- 36 (मृत्यू 2) कल्याण डोंबिवली- 35 (2) उल्हासनगर- 1 मिरा-भाईंदर- 36 (मृत्यू 1) पालघर- 4 (मृत्यू 1 ) वसई- विरार- 14 (मृत्यू 3) पनवेल- 7 (मृत्यू 1) नाशिक - 2 नाशिक मनपा- 1 मालेगाव मनपा - 11 (मृत्यू 2) अहमदनगर- 10 अहमदनगर मनपा - 16 धुळे -1 (मृत्यू 1) जळगाव- 1 जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1) पुणे- 7 पुणे मनपा- 228 (मृत्यू 27) पिंपरी-चिंचवड मनपा- 22 सातारा- 6 (मृत्यू 2) कोल्हापूर- 1 कोल्हापूर मनपा- 5 सांगली- 26 सिंधुदुर्ग- 1 रत्नागिरी- 5 (मृत्यू 1) औरंगाबाद- 3  औरंगाबाद मनपा- 16 (मृत्यू 1) जालना- 1 हिंगोली- 1 लातूर मनपा-8 उस्मानाबाद-4 बीड - 1 अकोला मनपा - 12 अमरावती मनपा- 4 (मृत्यू 1) यवतमाळ- 4 बुलढाणा - 13 (मृत्यू 1) वाशिम - 1 नागपूर मनपा - 25 (मृत्यू 1) गोंदिया - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget