![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
coronvirus | राज्यात आज 1026 नवे कोरोनाबाधित, 53 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांचा संख्या 24,427
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1026 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 24, 427आहे. तर दिवसभरात 53 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 339 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या पंधरा हजाराच्या उंबरठ्यावर गेली आहे.
![coronvirus | राज्यात आज 1026 नवे कोरोनाबाधित, 53 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांचा संख्या 24,427 coronavirus 1026 new corona infected patients increase in single day in state total number 24427 coronvirus | राज्यात आज 1026 नवे कोरोनाबाधित, 53 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांचा संख्या 24,427](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/13032528/Corona-Update-Maharashtra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1026 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24,427 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 53 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 28 जण मुंबईचे तर पुण्यातील 6, पनवेल 6, जळगाव 5, सोलापूर 3, ठाणे 2, औरंगाबाद, रायगड आणि अकोला शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 921 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 339 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 21 हजार 645 नमुन्यांपैकी 1 लाख 95 हजार 804 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 24, 427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 81 हजार 655 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 15 हजार 627 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 5125 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 29 पुरूष तर 24 महिला आहेत. त्यातील 21 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 27 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 5 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 53 रुग्णांपैकी 35 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 24,427
मृत्यू - 921
मुंबई महानगरपालिका- 14, 947 (मृत्यू 556)
ठाणे- 140 (मृत्यू 3 )
ठाणे महानगरपालिका- 1001 (मृत्यू 11)
नवी मुंबई मनपा- 955 (मृत्यू 4)
कल्याण डोंबिवली- 384 (मृत्यू 3)
उल्हासनगर मनपा - 53
भिवंडी, निजामपूर - 35 (मृत्यू 2)
मिरा-भाईंदर- 243 (मृत्यू 2)
पालघर- 38 (मृत्यू 2 )
वसई- विरार- 263(मृत्यू 10)
रायगड- 129 (मृत्यू 2)
पनवेल- 146 (मृत्यू 8)
नाशिक - 82
नाशिक मनपा- 43
मालेगाव मनपा - 616 (मृत्यू 34)
अहमदनगर- 54 (मृत्यू 3)
अहमदनगर मनपा - 10
धुळे - 9 (मृत्यू 3)
धुळे मनपा - 54 (मृत्यू 3)
जळगाव- 152 (मृत्यू 15)
जळगाव मनपा- 40(मृत्यू 9)
नंदुरबार - 22 (मृत्यू 2)
पुणे- 167 (मृत्यू 5)
पुणे मनपा- 2621 (मृत्यू 155)
पिंपरी-चिंचवड मनपा- 149 (मृत्यू 4)
सातारा- 123 (मृत्यू 2)
सोलापूर- 9
सोलापूर मनपा- 308 (मृत्यू 19)
कोल्हापूर- 13 (मृत्यू 1)
कोल्हापूर मनपा- 6
सांगली- 34
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 4 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग-6
रत्नागिरी- 55 (मृत्यू 2)
औरंगाबाद - 94
औरंगाबाद मनपा - 559(मृत्यू 15)
जालना- 16
हिंगोली- 61
परभणी- 1 (मृत्यू 1)
परभणी मनपा-1
लातूर -26 (मृत्यू 1)
लातूर मनपा- 5
उस्मानाबाद-4
बीड - 1
नांदेड - 4
नांदेड मनपा - 42(मृत्यू 4)
अकोला - 18 (मृत्यू 1)
अकोला मनपा- 151 (मृत्यू 11)
अमरावती- 5 (मृत्यू 2)
अमरावती मनपा- 84 (मृत्यू 11)
यवतमाळ- 98
बुलढाणा - 25 (मृत्यू 1)
वाशिम - 2
नागपूर- 2
नागपूर मनपा - 266 (मृत्यू 2)
वर्धा - 1 (मृत्यू 1)
भंडारा - 1
चंद्रपूर -1
चंद्रपूर मनपा - 3
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1289 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 12,923सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 54.92 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)