LIVE UPDATES | कर्नाटकातून पुण्याकडे कारमधून निघालेला बेकायदा गुटका पंढरपूरमध्ये पकडला
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले
येत्या महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी याबाबत दुजोराही दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना विचारले असता त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल या पद्धतीची व्यूहरचना आम्ही केलेली आहे. याच पद्धतीने आमच्या कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, नाना पटोले म्हणाले.
मीरा रोड सिलेंडरच्या स्फोटाने हादरलं
रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरलं आहे. रात्री 2 वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास 12 स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत.
दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदर अन् सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात कमी
देशात कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती. अशा परिस्थितही राज्याने कोविडचा चांगला मुकाबला केला आहे. त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहे, असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. राज्याचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.
शिवसेना आधिपेक्षाही जास्त ताकदीनं उभी राहिली; अमित शाहंना राऊतांचं सडेतोड उत्तर
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेना संपुष्टात आली असती म्हणणाऱ्यांना कशा प्रकारे या पक्षानं वास्तविकतेचा चेहरा दाखवला याचं प्रमाण दिलं. '1975 मध्ये रजनी पटेल आणि 90 मध्ये (बहुतेक मुरली देवरा यांनी) अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली', असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला.