LIVE UPDATES | कुडाळमध्ये डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचे बजेट सादर होणार
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महापालिकाचे बजेट सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. कोविड संकटामुळे मुंबईकरांचं कंबरडं मोडलंय आणि महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे. गेलं आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ 25 ते 30 टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. कोरोनामुळेच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डरांना प्रिमियमध्ये सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईकरांवर यावर्षी करवाढ टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानीवर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याचं सत्र सुरु असतानाच सदर प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
OBC Creamy Layer | ओबीसी क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरु असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे.
खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कंगनाला हायकोर्टाचा दिलासा; 5 फेब्रुवारीला सुनावणी
मुंबई : वांद्रे येथील बेकायदा बांधकामांनंतर कंगनाने खार येथील राहत्या फ्लॅटमध्येही अनधिकृत बांधकाम केल्याचं उघडकीस आलं आहे. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनाने दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिंडोशी न्यायालयाने तिचा दावा फेटाळून लावला आहे. याविरोधात कंगना रनौतनं आता हायकोर्टात अपील केलं असून 5 फेब्रुवारीपर्यंत या बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.
Farmers Protest | आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार कुठलीही नुकसान भरपाई देणार नाही. केंद्र सरकारच्या वतीने याबाबत लोकसभेत अधिकृत माहिती देण्यात आली. 70 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात दीडशेपेक्षा जास्त शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे.