एक्स्प्लोर

Coronavirus | दिलासादायक! पालघरमध्ये एका परिचारीकेसह इतर 9 जणांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह!

पालघर शहरासाठी काही अंशी दिलासादायक बातमी आहे. पालघरमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या परिचारिकेसह इतर 9 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पालघर : शहरात मिशन कंपाउंड येथे राहणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच टिमा हॉस्पिटल येथे उपचार घेत असणाऱ्या इतर 9 कोरोनाबाधितांचे देखील दुसऱ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले आहेत. याबरोबरच बोईसरमधील दलाल टॉवर भागातील 35 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कातील उर्वरित 4 संशयितांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले असल्याचे समजते आहे.

टिमा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या त्या 9 कोरोना बाधितांमध्ये सफाळे येथील रुग्णांचा आणि एका 3 वर्षीय मुलीच्या संपर्कातून कोरोनाची लागण झालेल्या काटाळे येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या परिचारिकेची मुंबईमध्ये करण्यात आलेली पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता या परिचारिकेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

बोईसरमधील दलाल टॉवर भागातील 35 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबातील इतर 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या तिघांना वगळता इतर सर्व अतिजोखमीच्या सहवासातील संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, पालघर जिल्ह्यांत कोरोना बाधितांचा आकडा 160 वर पोहोचला असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांपैकी 59 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या एकूण कोरोना तपासण्यांपैकी 2648 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 217 कोरोना चाचण्यांचे रिपार्ट येणं बाकी आहे.

संबंधित बातम्या : 

Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली

Lockdown 3.0 | देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; 17 मे पर्यंत राहणार चालू

लॉकडाऊनमुळे राजस्थान मधील कोटात अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी मायभूमीत दाखल

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget