एक्स्प्लोर
Coronavirus | देशातील 20 जिल्ह्यांमध्ये केंद्राची आरोग्य पथकं जाणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांचा समावेश
देशातील 20 जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची आरोग्य पथकं पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात अशी पथकं येणार आहेत.
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या जिल्ह्यांमधे मोठ्या प्रमाणात झालाय अशा देशातील 20 जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची आरोग्य पथकं पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात अशी पथकं येणार आहेत. स्थानिक प्रशासनाला कोरोनाला आळा घालण्यासाठी मदत करण्याच या पथकाचं काम असेल.
देशातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणारी ही आरोग्य पथकं कोरोनाचा प्रादुर्भाग झालेल्या भागात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांना सहकार्य करणार आहेत.
देशातील कोणत्या जिल्ह्यात जाणार 20 पथकं?
- मुंबई, महाराष्ट्र
- अहमदाबाद, गुजरात
- दिल्ली (दक्षिण पूर्व)
- इंदौर, मध्य प्रदेश
- पुणे, महाराष्ट्र
- जयपूर, राजस्थान
- ठाणे, महाराष्ट्र
- सूरत, गुजरात
- चेन्नई, तामिळनाडू
- हैदराबाद, तेलंगणा
- भोपाळ, मध्य प्रदेश
- जोधपूर, राजस्थान
- दिल्ली (मध्य)
- आग्रा, उत्तर प्रदेश
- कोलकाता, पश्चिम बंगाल
- कुरनूल, आंध्र प्रदेश
- वडोदरा, गुजरात
- गुंटूर, आंध्र प्रदेश
- कृष्णा, आंध्र प्रदेश
- लखनौ, उत्तर प्रदेश
- CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील
- राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी
- धारावीत कोरोनाचा कहर, मुंबईतल्या प्रतिधारावीत मात्र कोरोनाचे केवळ दोन रुग्ण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement