(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona in Sangli | सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
सांगली जिल्ह्यातील पश्चिम तालुक्यापर्यंत सीमीत असलेल्या कोरोना विषाणूने आता पूर्वेकडील तालुक्यात शिरकाव केला आहे. मुंबईहुन कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीमध्ये आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे.
सांगली : आतापर्यत सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा या पश्चिमेकडील तालुक्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने पूर्वेकडील तालुक्यात देखील शिरकाव केला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती मानखुर्द मध्ये भाजीपाला विक्रीचे काम करत होता. 27 एप्रिल रोजी तो मुंबईहून सोलापूर मार्गे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी या त्याच्या मामाच्या गावी आला होता. जिल्हा परिषदेच्या फिव्हर क्लिनिकच्या तपासणीत हा व्यक्ती संशयित आढळून आल्याने त्याचे स्वॅब घेतले होते. हा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर दुधेभावी गाव सील करण्यत आले आहे.
या व्यक्तीचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी असून ही व्यक्ती दुधेबावी येथे आपल्या मामाकडे आली होती. त्यामुळे दुधेभावी व येडेनिपाणी या दोन्ही ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सदर व्यक्ती काल फिवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. या तपासणीमध्ये सदर व्यक्तीची लक्षणे संशयास्पद वाटल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर सदर व्यक्तीला कालच मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले व कोरोना तपासणीसाठी स्वॅब पाठविण्यात आला. याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या समर्थनार्थ हायकोर्टात याचिका
निकटवर्तीय आयसोलेशन कक्षात या व्यक्तीच्या निकटवर्तीय धोकादायक संपर्क बाधितांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येत आहे. तर दुय्यम संपर्क बाधितांना कवठेमहांकाळ येथे इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात चार व्यक्ती कोरोना बाधित असून त्यांच्यावर मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील निगडी मधील दोन, कासेगाव मधील एक 94 वर्षीय आजी आणि मुंबईहून आलेला दुधेभावी मधील 40 वर्षीय व्यक्ती असे 4 जणांचा समावेश आहे. यापूर्वी संपूर्ण सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण साडल्याने लोक भयभीत झाले आहेत.
#Corona 'मे' महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या केसेस आढळणार नाहीत-प्राध्यापक नीरज हातेकर