एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Corona Vaccine : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्याला मुंबईत अटक, आतापर्यंत 284 रेमडेसिवीर जप्त

एकीकडे कोरोना लसीचा तुटवडा असताना दुसरीकडे रेमेडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याचं समोर येतंय. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली असून आतापर्यंत 284 रेमडेसिवीर जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे लसीचा तुटवडा आहे. यातच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारा होता. अटक केलेल्या व्यक्तीकडून  रेमडेसिवीरच्या 12 लसी (इंजेक्शन) जप्त करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध गुन्हे शाखेकडून केला जात आहे. 

मुंबई गुन्हे शाखेने अधिकाऱ्यांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली होती की अंधेरी ते जोगेश्वरी परिसरामध्ये रेमडीसीवीरचा  काळाबाजार केला जात आहे, या महितीच्या आधारे गुन्हे शाखा क्रमांक 10 ने सापळा रचला आणि त्या परिसरामध्ये छापेमारी सुरू केली. छापेमारी मध्ये रेमडेसिवीरच्या 12 लस सापडल्या, ज्याच्याकडे ही लस सापडली त्या व्यक्तीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आतापर्यंत 284 रेमडेसिवीर जप्त

मुंबई पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत 272 रेमडेसिवीर जप्त करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 284 रेमडेसिवीर जप्त करण्यात आले आहेत. रेमडेसिवीर लस ही कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर बरा होण्यासाठी दिली जाते. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता या लसीची मागणी वाढली आहे त्यामुळे काही असामाजिक तत्त्व या लसीचा काळाबाजार करून लोकांच्या जीवाची खेळत आहेत. या लासीची किंमत 1200 रु आहे, मात्र काळाबाजार करणारे ही लस 5500 ते 6000  रुपयांना विकत आहेत.

रेमडेसिवीर लसीचा काळाबाजार होतो याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. याच अनुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लस बनवणाऱ्या सात कंपन्यांसोबत गुरूवारी बैठकसुद्धा केली जेणेकरून या लसीचा काळाबाजारावर अंकुश लावता येईल....

तसेच लोकांना सुद्धा आवाहन करण्यात आला आहे की त्यांनी अशा प्रकारे जास्त पैसे देऊन ही लस विकत घेऊ नये, जर जास्त पैसे देऊन लोकांनी लस विकत घेतली तर काळाबाजार करणाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि याला अंकुश लावण्यास अडथळे निर्माण होईल. यासाठी जर लसीचा काळाबाजर थांबवायचा असेल तर लोकांनी हे करणं अपेक्षित आहे. 

गुन्हे शाखेकडून या रॅकेट मध्ये अजून कोणाचा समावेश आहे, ही लस कुठून आणली जात होती आणि कोणाला लस विकणार होते याचा तपास केला जात आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या तपासात काय समोर येतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Embed widget