Nana Patole : नाना पटोले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार; मोर्चात कार्यकर्त्यांच्या गाडीत चक्क विषारी साप, साऱ्यांची एकच धावपळ
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज भंडाऱ्याच्या लाखांदुर येथे पायदळ हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झालेत
Maharashtra Politics भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात आज भंडाऱ्याच्या लाखांदुर येथे पायदळ हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झालेत. लाखांदूर तालुक्यातील विरली येथून निघालेला हा मोर्चा 20 किलोमीटर अंतर कापून लाखांदूर येथे पोहचला. दरम्यान, या मोर्चात अनेक जण वाहनांनी सहभागी होण्यासाठी पोहचले होते. त्यातील एका कार्यकर्त्यांच्या AC वाहनातून चक्क विषारी सापनं (Poisonous Snakes) ही प्रवास केला.
पाऊनगाव इथं मोर्चा पोहचला असताना वाहनातील विषारी सापानं अचानक डोकं वर केलं. आणि AC वाहनात बसलेल्या कार्यकर्त्यांना साप दिसतात त्यांना एकच घाम फुटला. मग काय? चालकानं करकचून ब्रेक लावलेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी गाडीतून उड्या मारल्या. कार्यकर्त्यांची झालेली पळापळ बघून मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी सापाला मोठ्या शिताफीनं पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडलं.
सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालेलं सरकार आहे
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये तत्काळ आर्थिक मदत द्यावी, कृषी पंपांना दिवसा विद्युत पुरवठा करावा, अशा विविध मागण्यांना घेऊन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. लाखांदूर तालुक्यातील विरली येथून निघालेला हा मोर्चा लाखांदूर येथे 20 किलोमीटर अंतर कापून पोहोचला. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कर्जाचा बोजा त्यांच्यावर बसला आहे. असे असताना सरकारनं मागची नुकसान भरपाई दिलेली नाही.
50 हजार रुपये मदत देण्याचं आश्वासन दिलं ती देखील अद्याप दिलेली नाही. परिणामी राज्यात आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढत आहेत. मात्र हे सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालेलं सरकार आहे. या सरकारला जाग येण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. अशातच बांगलादेशात झालेली घटना आहे, त्या ठिकाणी हिंदूंवर होणारा अत्याचार बघवत नाहीत. देशात आलेलं मोदींचे सरकार हे युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबवू शकते, तर मग बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार का थांबवू शकलं नाही. नरेंद्र मोदी का चुप बसले आहेत, हा खरा प्रश्न निर्माण होतोय. याचा उत्तर निश्चितच सरकारने दिले पाहिजे.
महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतीच्या नुकसानीची मदत, पीक विम्याचा लाभ यांसह घरकुल लाभार्थ्यांच्या समस्यांना घेऊन यवतमाळच्या आर्णी तहसिल कार्यालयावर जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा धडकला. मोर्चात आदिवासी शेतकरी आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले. स्थानिक भाजप आमदाराने आर्णी, घाटंजी, केळापुर या तालुक्यांना वाऱ्यावर सोडले असून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही. कृषी वीज पुरवठा सुरळीत होत नाही, विकासकामांसाठी निधी मिळत नाही, घरकुलाचे हफ्ते रखडले आहेत.
कामगारांना योजनेचा लाभ नाही, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, वन्यप्राण्यामुळे पीक नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित आहे, असे अनेक आरोप यावेळी करण्यात आलेत. तसेच शेतीला तारकुंपण द्यावे, ठिंबक, स्प्रिंकलर चे रखडलेले अनुदान द्यावे, अशा मागण्याचे निवेदन देखील यावेळी देण्यात आले.
हे ही वाचा