एक्स्प्लोर

राणेंचे कुरघोडीचे सर्व आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले

नारायण राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र राणेंचे सर्व आरोप दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी फेटाळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारिणी नियमानुसारच बरखास्त केल्याचं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई : नारायण राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र राणेंचे सर्व आरोप दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी फेटाळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारिणी नियमानुसारच बरखास्त केल्याचं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. राणे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी शनिवारी बरखास्त करण्यात आली. मात्र त्यानंतर राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण नेहमी कुरघोडीचं राजकारण करत असल्याचा घणाघात राणेंनी केला. राणेंनी केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी नियमानुसार सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त केल्याचं स्पष्ट केलं. तसंच या निर्णयाबाबत हायकमांडलाही माहिती असल्याचं दिल्लीतील नेत्यांनी स्पष्ट केलं. काय आहे प्रकरण? काँग्रेस कमिटीने नारायण राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करुन, पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. त्यामुळे कोकणातील काँग्रेस म्हणजे आपणच अशा थाटात वावरणाऱ्या राणेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर एबीपी माझाशी बोलताना राणे म्हणाले की, नातवाच्या वाढदिवसादिवशी सीमोल्लंघन करत आहे. नवरात्रीत याचा शेवट करेन. सिंधुदुर्गात जाऊन पुढील रुपरेषा ठरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच कार्यकारिणी बरखास्तीवरुनही अशोक चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राणे म्हणाले की,  ‘’नांदेडमध्ये काँग्रेस संपली, आता राज्य काय सांभाळणार?’’ असा सवाल उपस्थीत केला आहे. तसेच काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण नेहमी कुरघोडीचं राजकारण करत आहेत,” असंही ते यावेळी म्हणाले. कार्यकारिणी बरखास्तीचं खासदार हुसेन दलवाईंकडून समर्थन सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचं काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंनी समर्थन केलं आहे. तसंच हा निर्णय पूर्वीच घेतला गेला पाहिजे होता असंही दलवाईंनी म्हटलं आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवरील आरोपांचाही दलवाईंनी राणेंचा समाचार घेतला आहे. सिंधुदुर्गातील राजकारण राणेंच्या हातात होतं, त्यांना काँग्रेसनं खूप मान-सन्मान दिला, मात्र त्यांनी पक्षासाठी काहीच केलं नसल्याचा आरोप दलवाईंनी केला. नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, आमदारही आहेत, जे अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये पक्षासाठी करुन दाखवलं ते राणेंना सिंधुदुर्गात जमलं नसल्याचं दलवाईंनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget