(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : राज ठाकरेंना 'फाईल' दाखवून भाजपने प्रचाराला लावलं, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप
Vijay Wadettiwar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना फाईल दाखवून भाजपने प्रचाराला लावलं असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या आधीच महायुतील पाठिंबा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने ते राज्यभरात जाहीर सभा घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. अशातच काल, शुक्रवारी पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते कि, मशिदींमधून (muslim) मौलवी फतवे काढत असतील तर, मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरगोस मतदान करून विजयी करा. असे आवाहन राज ठाकरे यांनी काल केलं. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकेचे झोड उठवत निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना फाईल दाखवून भाजपने प्रचाराला लावलं असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या लाईन मध्ये फिट होते. मात्र त्यांना दिल्लीत बोलावून काही फाईल दाखवल्या गेल्या आणि सांगितले गेलं की, प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून त्यांना आज अशा पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागत असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
हुकूमशाह म्हणणाऱ्यांना अचानक एवढा पुळका का?
गेल्या 2019 च्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना राज ठाकरे मोदी- शाहांवर टीका करताना त्यांना हुकूमशाह म्हणून संबोधत होते. मात्र, आता त्या हुकूमशाहीचा या देशातील लोकशाही टिकवणाऱ्यांना अचानक एवढा काय पुळका आलाय, असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. मात्र, राज ठाकरेंच्या या आवाहनाला लोक कितपद प्रतिसाद देतील, हा येणारा काळ ठरवेल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. यापूर्वी अजित पवारांविरोधात बोलताना राज ठाकरे अगदी अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करत होते. धरणाच वक्तव्यावर सूतोवाच करणारे कोण ते हेच राज ठाकरेच आहेत आहेत का? आता राज ठाकरेंच्या तोंडात चमचाभर नाही तर मूठभर साखर घालायला पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
देशाचे पंतप्रधान गल्लोगल्लीचा प्रचार करताय
देशाचे पंतप्रधान अलिकडे गल्लोगल्ली फिरल्यासारखे करत आहेत. त्याला गल्लोगल्लीचा प्रचार म्हणतात. देशाच्या पंतप्रधानांना हे शोभनीय नाही. त्या प्रतिष्ठेला हे साजेसे आहे का? हा विचार आता जनता करायला लागली आहे. दुसऱ्याचा आत्मा भटकतो म्हणणाऱ्यांना एवढी भटकंती का करावी लागत आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे. त्यामुळे त्यांना दुप्पट नाही तिप्पट सभा घ्यावा लागत आहेत. मात्र त्यांनी जितक्या जास्त सभा घेतल्या तेवढा त्यांचा मोठा पराजय होत जाईल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला.
इतर महत्वाच्या बातम्या