OBC Reservation : तोपर्यंत निवडणुका नाहीत, ओबीसी आरक्षणावर नाना पटोलेंची सांगितली 'मन की बात'
Nana Patole on OBC Reservation : जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने हीच भूमिका मांडली जाणार आहे.
Nana Patole on OBC Reservation : मंगळवारी ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. खरं तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मात्र काँग्रेस पक्षाचे स्पष्ट मत आहे की, जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने हीच भूमिका मांडली जाणार आहे. आम्हाला अपेक्षित आहे की ओबीसींना राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात, असे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालाय. राज्यसरकारने उद्याच्या सुनावणीसाठी चांगले वकील नेमलेले आहेत. राज्य सरकारची ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम राहावा यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, असेही पटोले म्हणाले.
अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द करण्यात यावा अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात ते मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यांना मोठे मोठे वकील उपलब्ध झाले. आम्हाला आता त्यात जायचं नाही, फक्त ओबीसींच्या राजकीय आरक्षण शिवाय निवडणुका होऊ नये अशी आमची भूमिका आहे, असेही पटोले यांनी सांगितलं
शिवसेना - राष्ट्रवादी युतीवर काय म्हणाले?
राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय करायचं? हा त्या दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे... आम्हाला त्यात जायचं नाही, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातल्या आमच्या भूमिका आधीच स्पष्ट केल्या आहेत, असे पटोले यांनी सांगितलं.
एसटी आंदोलनावर काय म्हणाले पटोले?
एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न काँग्रेस पक्ष येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात उचलणार आहे. राज ठाकरेंनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र राज्य सरकारने यासंदर्भातील भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. यामागे राजकारण आहे, हे कोणापासूनही लपलेलं नाही. एसटी सामान्य गरीब माणसांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.. त्यामुळे हे महामंडळ जिवंत राहिले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असून विधिमंडळात आम्ही ते मांडू.
बावनकुळेंना उत्तर -
नाना पटोले दबावात येत नाही तर दबावात आणतो आणि या संदर्भात जे काही आरोप माझ्यावर करत आहेत.. ते ज्यांना आपला बाप समजतात, त्या बापाशी लढणारा नाना पटोले आहे.. माझ्यावर असे आरोप करण्याची लायकी नाही.. ते डोक्यावर पडले आहेत, असा हल्लाबोल पटोले यांनी केला. नागपूरची विधानपरिषद निवडणूक स्ट्रॅटेजी चा भाग होत... आम्ही जे उमेदवार वेळेवर बदलवला त्याबद्दल आमच्या पक्षातून मागणी होती आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेतला, असेही पटोले यांनी सांगितलं.