एक्स्प्लोर

भाजपकडून केंद्रीय संस्थांचा गैरवापर, राज कुंद्रा भाजपात गेले तर 'ते' व्हिडीओ रामायणाचे होतील का? : नाना पटोले

जे लोक भाजप विरोधात बोलत आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जात आहे. मात्र भाजपात काय दुधाने धुतलेली लोक आहेत? त्यांच्यावर काय भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

भंडारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय संस्थांकडून होणाऱ्या कारवाईवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. भाजपकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सूडाने कारवाई केली जात आहे. भाजप विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजपमध्ये काय सर्व दुधाने धुतलेली लोकं आहेत? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.  

अनिल देशमुख प्रकरणात ईडीने सर्व सर्व विमानतळ प्राधिकरण यांना अनिल देशमुख यांच्या बाबत नोटिसा बजावल्या आहेत. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र जे लोक भाजप विरोधात बोलत आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जात आहे. मात्र भाजपात काय दुधाने धुतलेली लोक आहेत? त्यांच्यावर काय भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का? त्यांच्याकडे भ्रष्ट मालमत्ता नाही का? याची माहिती ईडी, सीबीआयकडे नाही का? असे प्रश्न सामान्य लोक विचारु लागले आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

भाजपवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटलं की, राज कुंद्रा यांनी जे व्हिडीओ बनवले आहेत ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. जर उद्या राज कुंद्रा भाजपात गेले तर ते व्हिडीओ रामायणाचे आहेत असं भाजप म्हणणार आहे काय? कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. भाजपचा विरोध केला म्हणून जर या स्वायत्त संस्थांचा कुणी गैरवापर करत असेल तर हे चुकीचे आहे.

भाजपच्या धोरणाविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर हे चुकीचे आहे. ईडी आणि सीबीआय स्वायत्त संस्था आहे, त्यांच्याकडून अशा कारवाईची अपेक्षा नाही. त्यांनी सर्वांवर एक समान कारवाई करावी. ज्यांनी चुकीची कामं केली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं. 

देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक - नाना पटोले

जावेद अख्तर यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली याबद्दल नाना पटोले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळेच जर आरएसएस देशाविकला जात असताना सुद्धा काही बोलत नाही. शेतकरी यांच्यावर लाठीमार होत असेल अशा प्रश्नांवर काही बोलत नाही. म्हणजेच या गोष्टींचे समर्थन जर आरएसएस करत असेल आणि त्या प्रश्नावर जर जावेद अख्तर काही बोलत असतील तर त्यात काही वेगळं नाही. कारण देशापेक्षा एखादी संघटना मोठी नाही आणि जर एखादी संघटना असं समजत असेल तर हे देशाला हानिकारक आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget