एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा 'वंचित'च्या वाटेवर?
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे दहा आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यातच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीमुळे सानंदा हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर तर नाही ना? असे तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. मात्र दिलीपकुमार सानंदा यांनी ही भेट औपचारिक असल्याचं सांगितलं आहे.
अकोल्यातील कृषीनगर भागातील आंबेडकरांच्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीने बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आपण 'बाळासाहेबां'चा आशिर्वाद घेण्यासाठी अकोल्यात आलो होतो, असं सानंदा यांनी 'माझा'ला सांगितलं.
दरम्यान, आजच अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे दहा आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. सोबतच संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता होता.
कोण आहेत दिलीपकुमार सानंदा?
-बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघातून 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीनदा आमदार.
- राज्याच्या राजकारणात दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक अशी ओळख.
- सावकारीच्या प्रकरणामुळे देशभरात वादग्रस्त ठरले होते. याच प्रकरणात कारवाई शिथील करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याच्या आरोपांमुळे विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद पणाला लागलं होतं.
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत मंत्री पांडुरंग फुंडकरांचा मुलगा आकाश फुंडकर यांच्याकडून पराभूत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement