मोदींना खुश करण्यासाठी फडणवीसांनी पाच वर्ष राज्याचं वाटोळं केलं : भाई जगताप
Bhai Jagtap : काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
Bhai Jagtap : काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर व्यक्त केलेल्य पश्चातापावर भाई जगताप यांनी टाकास्त्र सोडलं आहे. पहाटेच्या अंधारात केलेल्या पापाचा हा पश्चाताप आहे का? आमचं सरकार एक महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल हे सगळं करून थकल्याचा पश्चाताप आहे? अशी बोचरी टीका भाई जगताप यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी पाच वर्ष राज्याचं आणि मुंबईचं वाटोळं केलं आहे. जर तुम्हाला पश्चाताप करायचाच असेल तर या गोष्टीचा करा की तुम्ही राज्याचं वाटोळं केलं. ‘ मुंबई महानगर पालिका निवडणुकी स्वबळावर लढणार का? याबाबत विचारलं असता भाई जगताप म्हणाले की, मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार हे नवीन नाही, स्थानिक नेत्यांसोबत बोलून आमचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवलेला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल. पुणे महापालिका स्वबळावर लढणार का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘बाप रे बाप? पुण्याबद्दल काय बोलायचे...’
अंतर्गत गटबाजी –
काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी बद्दल विचारले असता भाई जगताप म्हणाले की, हा 136 वर्षाचा परिवार आहे , भांड्याला भांडं लागणारच, तेव्हा काळजी करु नका.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
केंद्र सरकारला जनतेचं काही देणंघेणं नाही. केंद्र सरकार राज्याची गळचेपी करतंय जो जीएसटीचा पैसा आहे तोही वेळेवर मिळत नाही. राज्याच्या तिजोरीत उत्पन्न नाही त्यामुळे दूसरा पर्याय नाही. जर राज्याच्या तिजोरीत पैसा असता तर मदत करायला आवडलं असतं. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी केलेला नाही. राज्याचे जीएसटीचे पैसे मिळाले तर बरं होईल.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live