एक्स्प्लोर

काँग्रेसकडून नियम वाकवून सुशीलकुमार शिंदेंना उमेदवारी?

नवोदितांना संधी देण्यासाठी पंचाहत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवू नये, अशी चर्चा काँग्रेस नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत झाली होती, मात्र सुशीलकुमार शिंदेंना सोलापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असेल, तर हा नियम त्यांना लागू करु नये, असंही बैठकीत ठरलं.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. गेल्या वेळी पराभवाचा फटका बसल्यानंतरही काँग्रेसने सुशीलकुमार शिंदेंना पुन्हा तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे 77 वर्षीय सुशीलकुमार शिंदेंना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाचा नियमही वाकवला. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते शरद बनसोडे खासदारपदी निवडून आले. बनसोडे मोदीलाटेवर स्वार होऊन विजयी झाल्याचं म्हटलं गेलं. बनसोडेंनी सुशीलकुमार शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. विशेष म्हणजे पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत शिंदेंचा हा पहिलाच मोठा पराभव होता. त्यानंतर, सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. सुशीलकुमार यांची कन्या आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सोलापुरातून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याचवेळी सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. 2014 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिंगणात उतरण्याची इच्छा खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस उमेदवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. नवोदितांना संधी देण्यासाठी पंचाहत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांनी निवडणूक लढवू नये, याविषयी चर्चा झाली होती, मात्र सुशीलकुमार शिंदेंना सोलापुरातून प्रतिष्ठा पणाला लावायची असेल, तर हा नियम त्यांना लागू करु नये, असं बैठकीत ठरलं. वय नव्हे, गुणवत्ता हाच उमेदवारीचा निकष असेल, हा काँग्रेसचा नियम आहे. ज्यांना विजयाची खात्री आहे, त्यांना वयाची फूटपट्टी न लावता तिकीट द्यावे, असं बैठकीत ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे पुन्हा खासदारपदी विराजमान होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget