Congress Candidates List : काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली 39 जणांची यादी जाहीर; काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही!
Congress Candidates List 2024 : काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.
![Congress Candidates List : काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली 39 जणांची यादी जाहीर; काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही! Congress announces list of 39 candidates for Lok Sabha Maharashtra is not included in the first list of Congress Congress Candidates List : काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली 39 जणांची यादी जाहीर; काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/08/a2fe3c4c970cd366c8bec0e7863fc80b1709907715966736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Congress Candidates List 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसने आज (8 मार्च) पहिली उमेदवार यादी जाहीर केली. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
In the first list of candidates for the 2024 Lok Sabha elections, Congress CEC has selected 39 names.
— Congress (@INCIndia) March 8, 2024
• 15 candidates are from the General category
• 24 candidates are from SC, ST, OBC and minority groups
• 12 candidates are below 50 years of age
• 8 candidates are in the… pic.twitter.com/YbH1dVuaLb
काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे आहेत. वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयातील व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत. काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.
LIVE: Congress party briefing by Shri @kcvenugopalmp, Shri @ajaymaken and Shri @Pawankhera at AICC HQ. https://t.co/CLwOrLFx9d
— Congress (@INCIndia) March 8, 2024
काँग्रेसच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश नाही!
दरम्यान, भाजपकडूनही पहिली यादी 195 उमेदवारांची घोषित करण्यात आली असली, तरी महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाची घोषणा झालेली नाही. यावरून महायुतीमध्ये असलेल्या जागावाटपावरून सुरु असलेल्या घडामोडींचा अंदाज येतो. दुसरीकडे, काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही एकमत झालेलं नाही. वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा अजूनही निकालात निघालेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान देण्यात आलेल नाही.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 39 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम घोषित किए गए। pic.twitter.com/jOQk3rycwG
— Congress (@INCIndia) March 8, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)