राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं
हाथरस बलात्कार आणि हत्येतील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटम आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत.
मुंबई : हाथरस बलात्कार आणि हत्येतील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात योगी सरकार विरोधात आंदोलनं होणार आहेत. युवा काँग्रेस संध्याकाळी 6 वाजता आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, अस्लम शेख, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, झिशन सिद्दकी आणि काँग्रेस पदाधिकारी मंत्रालयाच्या बाजूला महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन करत आहेत.
नाशिकमध्ये राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली या घटनेचा युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची उत्तर प्रदेश आणि मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. तर पंढरपूर येथे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.
हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे काँग्रेसच्या वतीने अचानक रस्ता रोको करण्यात आला. काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी हे भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथे रास्तारोको करण्यात आला आहे. त्या ठिकाणी असलेल्या बदोबस्त करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे. या संदर्भासाठी औंढा येथील काँग्रेस कमिटीच्या वतीने अचानक बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आला. केंद्र शासन आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली आहे.
Hathras Gang Rape | राहुल गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक
राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसकडुन निदर्शने करण्यात आली. पुण्यातील झाशीची राणी चौकात बालगंधर्व रंगमंदीरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं आणि घोषणा देण्यात आल्या.
उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी झालेल्या अमानुष सामूहिक बलात्कार आणि हत्येस जबाबदार आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी यासाठी संपूर्ण देशभरात घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त केल्या जात आहे. अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध व्यक्त केला.
Hathras | राहुल गांधी यांना हाथरस येथे झालेल्या धक्काबुक्कीनंतर राज्यात तीव्र पडसाद
उत्तर प्रदेश मधील हातरस येथे जात असताना राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे. तसेच जबरदस्तीने जेलमध्ये टाकणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, अशी टीका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली असून उत्तर प्रदेशात घडलेली घटनेचा निषेध ही त्यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस याठिकाणी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीं यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्की व अटकेच्या निषेधार्थ परभणीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आहेत. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निदर्शने करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करून योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
#RahulGandhi मी एकटा जाऊ इच्छितोय,मग कोणत्या नियमांच्या उल्लंघनासाठी मला अटक? राहुल गांधी यांचा सवाल