हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. मात्र हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यावर राहुल गांधी ठाम आहेत.
![हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की Congress leader Rahul Gandhi manhandled by police हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/01202741/rahul-dhakka-web5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हाथरस (उत्तर प्रदेश) : हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला. मात्र हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यावर राहुल गांधी ठाम आहेत.
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.
पोलिसांनी धक्का दिला आणि लाठी मारुन पाडलं अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी या घटनेवर दिली. मात्र मी हाथरसला जाणारच. "कलम 144 लागू असलं तरी मी एकटा चालत जाईन. कुटुंबाला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राहुल आणि प्रियंका यांनी आतापर्यंत जवळपास तीन किलोमीटर त्यांनी अंतर कापलं आहे. हाथरसला जाणारच, आता इथून मागे फिरणार नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)