एक्स्प्लोर

साताऱ्यातील दोन 'राजें'मधला संघर्ष मिटला! खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकरांची खास भेट!

रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून वाद टोकाला गेल्याचे चित्र संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राने पाहिले आहे.जे दोन राजे एकमेकांकडे कट्टर विरोधक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून पाहत होते ते दोन राजे समोरासमोर बसून गप्पा मारताना दिसले.

सातारा : साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून वाद टोकाला गेल्याचे चित्र संपूर्ण साताऱ्यासह  महाराष्ट्राने पाहिले आहे.  लोकसभा-विधानसभेच्या कालावधीत तर हा वाद खूप विकोपाला गेला होता. त्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात तर उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी जाऊन राडाही घातला होता. तशी नोंदही पोलीस ठाण्यात आहे. त्याचबरोबर दोन राजघराण्यातील संघर्षामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती.

उदयनराजे यांच्यामुळेच अनेकांनी भाजपची वाट स्वीकारली आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकला अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळाली. मात्र या दोन राजेंचा संघर्ष मिटला असे चित्र काल दिसले. रामराजे नाईक-निंबाळकर हे जिल्हा शासकीय निवासस्थानी म्हणजे सर्किट हाऊसमध्ये बसलेले असताना उदयनराजे भोसले हे अचानक त्या ठिकाणी आले आणि रामराजेंना हात जोडून नमस्कार केला.

रामराजे यांनीही त्यांना हात जोडून नमस्कार करून बसण्याची विनंती केली. दोघेही समोरासमोर बसल्यानंतर मात्र प्रशासन यंत्रणेसोबत पोलीस खात्याचीही भांबेरी उडाली. नुसती भांबेरी उडाली नाही तर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली. कार्यकर्ते सैरभेर झाले. जे दोन राजे एकमेकांकडे कट्टर विरोधक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून पाहत होते ते दोन राजे समोरासमोर बसून गप्पा मारताना दिसले. चर्चा नेमकी काय झाली हे जरी समजू शकले नसले, तरी या दोघांची झालेली ही भेट म्हणजे यांच्यातील वाद संपुष्टात आला असे म्हणायला हरकत नाही.

दोघांच्या दिलखुलास गप्पानंतर कोरोना विषयावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. जाताना रामराजे यांनी त्यांना कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचा सल्ला दिला. उदयनराजे भोसले यांची झालेली ही बैठक योगायोग होता की अजून काही हे मात्र समजू शकले नाही. तरी एकमेकांचे राजकीय आस्तित्व संपवू पाहणारे हे दोन दिग्गज राजे मात्र  एकमेकांच्या समोर बसून गप्पा मारताना पाहिल्यावर सातारकरांना मोठा दिलासा मिळाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
Embed widget