एक्स्प्लोर

Nitin Deshmukh: ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला नोटीस, नितीन देशमुखांना हजर राहण्याचे एसीबीचे आदेश

Nitin Deshmukh: उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे.

Nitin Deshmukh: उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीनं नोटीस पाठवली होती. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. 

नितीन देशमुख काय म्हणाले?
नोटीस आल्यानंतर नितीन देशमुख यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. 17 जानेवारी रोजी अमरावतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालमत्तेची माहिती देण्यास सांगितलं आहे. 17 तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे, असे नितीन देशमुख यांनी सांगितलं. 

आरोपाबाबात विचारलं असता ते म्हणाले की, मी चौकशीसाठी हजर राहणार आहे. पण तक्रार देणाऱ्याचं नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवलाता कुणाची तक्रार आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे, त्याचाही उल्लेख नाही. 17 तारखेला अमरावतीमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असे देशमुख म्हणाले.... तक्रारकर्त्याच्या नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस पाठवण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचं नाव समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. त्याला कुणी तक्रार द्यायला लावलं, हे समजेल... 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असेही देशमुख म्हणाले. 

एसीबीच्या रडारावर असणारे ठाकरे गटाचे आमदार -

राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि आता बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे.  17 तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. 

नोटीसमध्ये काय म्हटलेय?
उघड चौकशी संबधाने जबाब देणेकामी उपस्थित राहण्याबाबत नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/46/अकोला/2022 अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परीक्षेत्रात अमरावती येथे सुरु आहे. 

सदर उघड चौकशीचे संबधाने आपले बयान नोंदविणे आवश्यक असल्याने बयान देणेकरिता आपण 17 जानेवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधिक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती येथे उपस्थित राहवे... तसेच सोबत दिलेल्या मत्ता दायित्व फ़र्म क्रमांक एक ते साची संपूर्ण माहिती भरुन द्यावी..

आणखी वाचा:
Nitin Deshmukh Speech :गुवाहटीला पोहोचले कसे, पळून कसे आले, नितीन देशमुखांनी भाषणात सांगितली घटना

महत्त्वाच्या बातम्या

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget