एक्स्प्लोर

सदोष बियाणे प्रकरणी भरपाई द्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करु, डॉ. अजित नवलेंचा इशारा

सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आणि दोषींवर कारवाईबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा. सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कष्ट आणि मजुरी यावरील संपूर्ण खर्च वाया गेला आहे, असं अजित नवले यांनी म्हटलं.

मुंबई : सदोष सोयाबीन बियाणे प्रश्नी उगवन क्षमता कमी आढळलेले बियाणे बदलून देण्याच्या सूचना राज्याच्या कृषीमंत्र्यांनी महाबीजला दिल्या आहेत. परंतु केवळ बियाणे बदलून उपयोग नाही. सदोष बियांणामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन करेल असा, इशारा किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले की, सदोष सोयाबीन बियाणे प्रश्नी उगवण क्षमता कमी आढळलेले बियाणे बदलून देण्याच्या सूचना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी महाबीजला दिल्या आहेत. राज्याचे अवर सचिव उमेश चांदवडे यांनी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून या सूचना कळवल्या देखील आहेत. परंतु केवळ सूचना देऊन उपयोग नाही. दक्षता समित्यांच्या निर्णयांची वाट न पाहता महाबीजच्या स्तरावर तक्रारींची खातरजमा करून बियाणे बदलून देण्याची कारवाई करावी.

यासोबतचं सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आणि दोषींवर कारवाईबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा. सध्या सरकारकडून मौन बाळगण्यात आले आहे. सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कष्ट आणि मजुरी यावरील संपूर्ण खर्च वाया गेला आहे. शिवाय ओल व वापश्याची वेळ हातातून निघून गेल्याने दुबार पेरणीत पुन्हा पीक उगवेल किंवा नाही हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला सदोष बियाणे पुरविणाऱ्या कंपन्या व सरकारचा बियाणे गुणवत्तेवर नजर ठेवणारा विभाग जबाबदार आहे. आपली जबाबदारी स्वीकारून सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. सरकार मात्र आपली ही जबाबदारी झटकत आहे.

पत्रामध्ये केवळ महाबीजच्या बियाणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. महाबीज व्यतिरिक्त अनेक इतर कंपन्यांनी शेतकऱ्यांना सदोष बियाणे पुरविले आहेत. या कंपन्यांना सरकारी यंत्रणेनेच हे बियाणे पुरविण्याची परवानगी दिलेली आहे. असे असताना केवळ महाबीजलाच पत्र पाठवून इतर बाकी कंपन्यांना मोकळे सोडले जात आहे. सरकारच्या कृषी विभागाने याबाबतही तातडीने खुलासा करण्याची आवश्यकता आहे. सदोष बियाणे प्रश्नी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मोफत बियाणे उपलब्ध करून देत असतानाच, सदोष बियाणे पुरविणारांवर व असे सदोष बियाणे पुरविले जाणार नाही याची जबाबदारी असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

शेतकऱ्यांना मशागत, पेरणी, निविष्ठा व मजुरी खर्चासह संपूर्ण खर्च विचारात घेऊन नुकसान भरपाई द्यावी. यासोबतच़ भावी काळात असे प्रकार होऊ नयेत यासाठी कठोर उपाय योजना करावी अशी देखील मागणी किसान सभा करत आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करत केवळ महाबीजचे बियाणे बदलून देण्यावर शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा किसान सभा देत आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget