एक्स्प्लोर

अधिकाऱ्यांनी वेड्यात काढलं, पण गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाचं चक्रव्यूह भेदलं!

पाईपलाइनची सवय असणाऱ्या अनेकांनी विचारही केला नसेल की, निसर्गाचे झरे किंवा नाल्यांतून एखाद्या शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. पण अभिमन्यू काळेंनी ते शक्य करुन दाखवले आहे.

गोंदिया : गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली आणि पाणीटंचाईवर मात करत गोंदिया जिल्ह्याला पाणी मिळवून दिलं. अभिमन्यू काळे यांनी पुजारी टोला धरणातून येणारे कॅनॉल जिल्ह्याला जोडले जातील अशा पद्धतीने वळवले आणि त्यामधून हे पाणी वाहत वाहत वैनगंगेच्या पात्रात पोहोचलं. अशाप्रकारे तब्बल 75 किलोमीटरचं अंतर पार करुन जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाणी गोंदिया जिल्ह्याला मिळवून दिलं. गोंदिया जिल्ह्याला पाणी मिळवून देण्यासाठीचा अभिमन्यू काळे यांचा हा प्रयत्न सहज-सोपा नव्हता. त्यामागे अथक प्रयत्न होते. पाणी मिळवण्यासाठीची त्यांची धडपड पाहून अनेक अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी त्यांना अक्षरश: वेड्यात काढले होते. मात्र अथक प्रयत्नाने 75 किमीचं अंतर पार करुन पाणी गोंदियात पोहोचलं. अधिकाऱ्यांनी वेड्यात काढलं, पण गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाचं चक्रव्यूह भेदलं! अशक्य काहीच नसतं, फक्त जिद्द आणि मेहनत या गोष्टींची गरज असते, हेच गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दाखवून दिले आहे. जेव्हा गोंदियाचे स्वत:चे हक्काचे पाणी आटू लागले, तेव्हा पाण्याचा शोध सुरु झाला. गोंदिया शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुजारी टोला धरणात पाणी तर होते, पण धरणाचे कुठलेही कॅनॉल हे गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुठल्याही यंत्रणेशी जोडलेले नव्हते. तेव्हा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी एक आगळी-वेगळी शक्कल लढवली. त्यांनी शोध सुरु केला अश्या सुकलेल्या झऱ्यांच्या आणि नाल्यांच्या ज्यांच्या मार्फत गोंदियाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदी पात्रात पाणी आणला जाऊ शकते. हे करत असताना प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी काळेंना वेड्यात काढले. पण काळेंनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. अधिकाऱ्यांनी वेड्यात काढलं, पण गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाचं चक्रव्यूह भेदलं! पुजारी टोला धरणातून येणारे कॅनॉल हे गोंदियाच्या 75 किलोमीटर अंतरावर आहेत. कॅनॉल छेदून नाल्यांमधून वैनगंगेच्या पात्रात पाणी आणले गेले. या नदीला आधीपासूनच उपसासिंचन योजना जोडलेली होती. नदीपात्रातून पाणी उचलून गोंदियाला पाणी पुरवठा करणाऱ्या या फिल्टरेशन प्लांटमध्ये पाणी आणून गोंदियाची तहान भागवली जात आहे. या दरम्यान अडचणी आल्याच नाहीत, असे नाही. अनेकदा कॅनॉलला छेद देताना पाणी भलतीकडेच वाहून जात असे, तर कधी कॅनॉलच फुटण्याच्या घटना घडल्या. मात्र गोंदियाची तहान भागवायचीच या ध्येयाने पछाडलेल्या अभिमन्यू काळेंनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि अखेरीस यश मिळवलेच. अधिकाऱ्यांनी वेड्यात काढलं, पण गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाचं चक्रव्यूह भेदलं! पाईपलाइनची सवय असणाऱ्या अनेकांनी विचारही केला नसेल की, निसर्गाचे झरे किंवा नाल्यांतून एखाद्या शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. पण अभिमन्यू काळेंनी ते शक्य करुन दाखवले आहे. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Embed widget