एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. चे नाव! आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Navi Mumbai International Airport : नवी मुंबईतील स्थानिकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे.

Navi Mumbai International Airport : मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्यावरून स्थानिकांचे मोठे आंदोलन सुरू होते. आता या आंदोलनाला यश मिळत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने सहमती दर्शवली असल्याची माहिती आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आली. विमानतळाच्या नामकरणावरून एकनाथ शिंदे यांनी भांडणे लावली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मोठे आंदोलन नवी मुंबईत सुरू होते. सरकारकडून या विमानतळासाठी शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. आज नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला काहीच हरकत नसल्याचे म्हटले. 

एकनाथ शिंदेवर निशाणा

एकनाथ शिंदे यांनी समाजात भांडण लावल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नामकरणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळात योग्य माहिती प्रस्ताव दाखल केला नव्हता. आता मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवला आहे. 

सिडकोवर मोर्चा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शुक्रवारी (24 जून) सर्वपक्षीय कृती समितीतर्फे दि बा पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सिडको घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त या आंदोलनासाठी आले होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात होते.

विमानतळाच्या नामकरणावरुन राजकीय वाद

गेल्या काही महिन्यांपासून नवीमुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरु आहे. नवी मुंबईचे निर्माण हे स्थानिक आगरी-कोळी-कराडी प्रकल्पग्रतांच्या जमिनीवर करण्यात आलं आहे. याच जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून या विमानतळाच्या नामकरणावरुन राजकीय वाद सुरु झाले आहेत. त्यातच, नवी मुंबईची प्लॅनिंग ऑथोरिटी असलेल्या सिडकोने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव केला. तर, राज्य सरकार देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी या निर्णयाला विरोध केला होता. 

कोण होते दि बा पाटील?

> दि बा पाटील यांचा जन्म 13 जानेवारी 1926 रोजी जासई , उरण येथे झाला
> वकिलीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली 
> पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ते चार वेळा आमदार होते. 
> रायगड लोकसभेचे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
> 1999 मध्ये दि बा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला.
> सिडकोने 1970 साली नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी नवी मुंबई, पनवेल उरण भागातील 97 गावांच्या जमिनीचा ताबा घेतला होता. घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात तुटपुंजी मदत आगरी-कोळी जनतेला केली होती.
> याला विरोध करत दि बा पाटील यांच्याकडून आंदोलन उभे करण्यात आले. यात 5 शेतकरी हुतात्मे झाले. तर 100 जण जखमी झाले होते.
> अखेर महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत भरीव मदत करण्यास सुरवात केली. घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात 12.5 टक्के विकसित भूखंड देण्यात आले.
> जेएनपीटी बंदराच्या उभारणीतही शेतकरी वर्गाच्या जमिनी घेतल्यानंतर दि बा पाटील यांनी वयाच्या 87 व्या वर्षी ॲम्ब्युलन्समधून येत आंदोलन केले होते.
> शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे दि.बा.पाटील यांचे 24 जून 2013 रोजी निधन झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Embed widget