एक्स्प्लोर
तूर खरेदीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या भेटीला
सोलापूर : तूर खरेदी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेणार आहेत. तुरीची निर्यातबंदी उठवण्याबाबतीत या भेटीत चर्चा होईल. तुरीवरची निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचा मार्ग सोपा होईल, अशी माहिती सहकार आणि पणण मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. नाफेडने 22 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. तूर खरेदी केंद्रांबाहेर शेतकरी तळ ठोकून बसलेले आहेत. मात्र तूर खरेदीची मुदत संपल्याने नाफेडने खरेदी बंद केली आहे. बारदान्याअभावी आधीपासूनच चर्चेत असलेली तूर खरेदी सरकारने अखेर बंद केली. शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तूर खरेदी केंद्रांवर विकण्यासाठी आणलेली तूर परत नेण्यासाठीही अनेक शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्चही द्यायला पैसे नाहीत. नाफेडने तूर खरेदी बंद केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्रांबाहेर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा पाहायला मिळाल्या. लातूर, अकोला, सोलापूर, हिंगोलीसह जवळपास प्रत्येक तूर उत्पादक जिल्ह्यात असंच चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी सगळी कामं सोडून खरेदी केंद्राबाहेर तुरीची राखण करत आहे. हिंगोली जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. तुरीचे उत्पादन चांगले झाल्याने शेतकरी सुखावला होता. तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. व्यापारी 4000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत होते, तर शासन 5000 रुपये प्रति क्विंटलने खरेदी नाफेडच्या माध्यमाने करत होते. औरंगाबादमध्ये तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्याला चक्कर सरकारने तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका 75 वर्षीय शेतकऱ्याला तूर खरेदी केंद्रावर चक्कर आली. खाली पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत आणि त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. सोनवाडी येथील शेतकरी रंगनाथ आल्हाट मागील आठ दिवसांपासून तूर विक्रीसाठी पैठण येथील केंद्रावर बसून होते. त्यांना उन्हाचा चटका बसून चक्कर आली. त्यामुळे त्यांचा पाय कंबर आणि मांडी यांच्यामध्ये मोडला आहे. त्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे. रंगनाथ आल्हाट यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 50 हजार रूपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र तूर विकली तरीही 28 हजार रुपयेच मिळतील, त्यामुळे उपचारासाठी बाकीचे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित बातम्या :
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च
तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























