एक्स्प्लोर

आपल्याकडे 'हल्लाबोल' करणाऱ्यांचे 'डल्लाबोल' पुरावे : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी असेल याची झलक दिली आहे.

नागपूर : ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी असेल याची झलक दिली आहे. नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. इतकंच नाही, तर विरोधकांची गाडी ही अजूनही सैराटवरच अडकली असून, त्यातून बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांना हात घातला. सर्व पिकांमध्ये वाढ आहे, कापूस गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 70.46 लाख होता, तो यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच 51.90 लाख क्विंटल आला असल्याचं त्यांनी सांगितलं. गोसीखुर्द प्रकल्पाबाबतची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यासाठी 18 हजार 500 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. पुढील 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ''ज्यांना अर्ज करता आला नाही त्यांनाही कर्जमाफीचा लाभ'' दरम्यान कर्जमाफीला पात्र होते, मात्र त्यांना अर्ज करता आला नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीसाठी एकूण 77 लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी 69 लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतले. त्यातून जवळपास 41 लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ''नाना पटोलेंना त्यांच्या निर्णयाची लवकरच उपरती होईल'' भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षाचं सदस्यत्वही सोडलं आहे. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा होता, याची उपरती त्यांना लवकरच होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख हे देखील नाना पटोले यांच्यानंतर बंड करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण त्यांनी विविध मुद्द्यांवर सात पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. पण हे पत्र मला मिळण्याअगोदरच माध्यमांना मिळालं, असं म्हणत आशिष देशमुख यांच्यावरच पलटवार केला आहे. संबंधित बातम्या :

स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त, आशिष देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
Dharashiv News: दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
Central Railway Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget