एक्स्प्लोर

जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, त्यांना सद्बुद्धी मिळो; मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र

आजचा  सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत जाऊन दर्शन घेणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

ठाणे : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळची प्रतीक्षा अखेर संपली. अयोध्येत (Ayodhya)  राममंदिरात (Ram Mandir)  प्रभू श्रीराम विराजमान झाले. मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरातून मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde)  तर  नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाईव्ह सोहळा पाहिला. राममंदिराला लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासह भेट देणार आहे. आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. ते ठाण्यत बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  आजचं निमंत्रण खरं तर मलाही होतं. मात्र एकट्याने दर्शन घेण्याऐवजी अख्खं मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार  आहे. महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामलल्लाचं एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेले आहे. आजचा  सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत जाऊन दर्शन घेणार आहे. 

बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो,अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले,  काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे. सर्वांनी या सोहळ्यात शामील झालं पाहिजे. काही लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत  मात्र जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत.  

अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा : पंतप्रधान

"अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम", अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत. 

आज कारसेवकांचे आत्मे सुखावले : राज ठाकरे

आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आहेत. 32 वर्षांनी शरयू नदी हसली, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर दिली आहे.

संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण

संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
 

हे ही वाचा :

जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, पंतप्रधान मोदींकडून विधीवत प्रतिष्ठापना

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget