जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, पंतप्रधान मोदींकडून विधीवत प्रतिष्ठापना
संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
Ayodhya Pran Pratishtha ceremony : संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 12.29 या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.
तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली होती. कलाकार, खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोधामध्ये आले होते. प्राणप्रतिष्ठावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी 'याची देही याची डोळा पाहिला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला.
तो ऐतिहासिक क्षण आलाच... प्रभू श्रीराम हे मंदिरात विराजमान झाले, ज्या क्षणाची सारे राम भक्त गेल्या 500 वर्षांपासून वाट पाहत होते तो क्षण अख्ख्या देशाने अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण अयोध्या ही राममय झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट -
कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की, "अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम."
अयोध्या धाम में श्री राम लला की प्राण-प्रतिष्ठा का अलौकिक क्षण हर किसी को भाव-विभोर करने वाला है। इस दिव्य कार्यक्रम का हिस्सा बनना मेरा परम सौभाग्य है। जय सियाराम! https://t.co/GAuJXuB63A
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
दिग्गजांची उपस्थिती -
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अनेकांनी 'याची देही याची डोळा पाहिला. या सोहळ्याला देशभरातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कलाकार, व्यावसायिक, राजकीय नेते, खेळाडूंचा समावेश होता. सरसंघचालक मोहन भागवत, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कंगना, रविंद्र जाडेजा, अनिल कुंबळे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
साध्वी ऋतंभरा, उमा भारती भावूक
साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली. त्यावेळी दोघीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकींची गळाभेट घेतली.